‘कुकडी’ जवळ सापडला ब्रिटिशकालीन बॉम्ब

By admin | Published: May 25, 2014 12:06 AM2014-05-25T00:06:48+5:302014-05-25T00:35:21+5:30

श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्याजवळील प्रशांत वाबळे यांच्या शेतात ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली.

British bomb exploded near 'Kukadi' | ‘कुकडी’ जवळ सापडला ब्रिटिशकालीन बॉम्ब

‘कुकडी’ जवळ सापडला ब्रिटिशकालीन बॉम्ब

Next

श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्याजवळील प्रशांत वाबळे यांच्या शेतात ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली. नगर येथील बॉम्ब निकामी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाचा रात्री उशिरापर्यत हा बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु त्यात यश न मिळाल्यास उद्या (रविवारी) लष्कराच्या मदतीने हा बॉम्ब निकामी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. प्रशांत वाबळे हे जेसीबीने जमिनीचे सपाटीकरणाचे काम सुरू होते. यावेळी जेसीबी चालकास बॉम्ब दिसला. चालकाची एकच धांदल उडाली. कुकडी कारखाना कामगार व नागरिकांची बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी उसळली. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक नारायण वाखारे यांनी घटनास्थळास भेट दिली. शेतातील खोदकाम बंद करून तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब श्ािंदे यांना माहिती दिली. शिंदे यांनी कुकडी साखर कारखान्यावर तातडीने बॉम्ब निकामी करणारे पथक पाठविले. या पथकाचा रात्री उशिरापर्यंत बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न सुरू होता. हा ब्रिटिशकालीन ग्रिनाईड बॉम्ब आहे. बॉम्बची लांबी १ फूट आहे. वजन ३ ते ४ किलो आहे. पिंपळगाव, विसापूर शिवारात दौंड-मनमाड लोहमार्गाच्या पश्चिमेला इंग्रजांच्या सैन्याची छावणी होती. या ठिकाणी इंग्रजांनी मोठा दारुगोळा ठेवला होता. मात्र हा ब्रिटिशकालीन बॉम्ब सैन्यदलाच्या छावणीच्या बाहेर कसा पडला. स्वातंत्र्यासाठी झुंज देणार्‍या एखाद्या क्रांतिवीराने हा बॉम्ब बाहेर काढला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: British bomb exploded near 'Kukadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.