शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा, उध्दव ठाकरेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 09:51 PM2018-10-21T21:51:58+5:302018-10-21T21:58:08+5:30

अहमदनगर येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्रांगणातील जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मंदिर वही बनायेगे, तारीख नही बतायेंगे.

A big scam through farmer's debt, serious allegations of Uddhav Thackeray | शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा, उध्दव ठाकरेंचा गंभीर आरोप

शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा, उध्दव ठाकरेंचा गंभीर आरोप

Next

अहमदनगर : आम्ही सरकारचा विरोध करीत नसून फक्त जनतेची बाजू मांडत आहे. राज्यातील शेतकऱ्यांनाना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. 

अहमदनगर येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्रांगणातील जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मंदिर वही बनायेगे, तारीख नही बतायेंगे. असे खोटे आश्वासन सरकार देत आहे. आताचे मजबूत सरकार आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडून काहीही होणार नाही. मोहन भागवत यांचेही मी आभार मानतो. जी मागणी आम्ही केली ती भागवतांनी केली. राम मंदिरासाठी सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. रामाची शपथ घेऊन राममंदिर उभारू असे सांगा, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे म्हणताना धार्मिक राजकारण करून घरे पेटवण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोपही उद्धव यांनी केला. 

Web Title: A big scam through farmer's debt, serious allegations of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.