औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावरील वाहतूक वळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:38 AM2019-07-23T11:38:07+5:302019-07-23T11:39:42+5:30

मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील वर्षी प्रवरासंगम येथील गोदावरी पुलावरून उडी मारून काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली.

Aurangabad - Traffic on Ahmednagar highway diverted | औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावरील वाहतूक वळविली

औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावरील वाहतूक वळविली

googlenewsNext

नेवासा : मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील वर्षी प्रवरासंगम येथील गोदावरी पुलावरून उडी मारून काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेस मंगळवारी २३ जुलै रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या वर्षश्रध्दानिमित्ताने गोदावरी पुलावर स्थळ पूजन, सामूहिक श्रद्धांजली तसेच जुने कायगाव (ता.गंगापूर) येथील घाटावर वृक्षारोपण व किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग क्रमांक ६० या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
कायगाव मध्ये वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी ६ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले.
दरम्यान काकासाहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठा क्रांती मोचार्चे समन्वयक आणि शिवप्रेमींनी सोमवारी रात्रीच कायगाव पुलाच्या सुरवातीलाच चबुतरा उभारत काकासाहेब शिंदे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या घटनेनंतर कायगाव पुलाचे नामकरण 'हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू' असे करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात नेवासा फाटा, खडका फाटा, प्रवरासंगम येथे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शिर्डी कडून औरंगाबाद कडे जाणा-या सर्व बस बंद ठेवण्यात आल्या आहे. तर नेवासा कडून औरंगाबादला जाणारी वाहने शेवंगावकडून वळविण्यात आली आहे.

असा आहे बदल
औरंगाबादकडून अहमदनगर, पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बिडकीन -पैठण - शेवगाव मार्गे जातील.

अहमदनगर, पुणेकडून येणारी सर्व प्रकारची वाहने ही शेवगाव- पैठण -बीडकीन मार्गे औरंगाबादकडे जातील

Web Title: Aurangabad - Traffic on Ahmednagar highway diverted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.