पासवर्ड विचारून एटीएममधून पैसे लुटले

By Admin | Published: May 28, 2014 11:55 PM2014-05-28T23:55:49+5:302014-05-29T00:25:35+5:30

अहमदनगर : अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमच्या खात्याचा पासवर्ड विचारून अनोळखी इसमाने शिवाजी निवृत्ती करांडे (रा. सांडवा, ता. नगर) यांच्या खात्यातील ९५ हजार रुपये लंपास केले.

Asking for password, looted money from ATM | पासवर्ड विचारून एटीएममधून पैसे लुटले

पासवर्ड विचारून एटीएममधून पैसे लुटले

googlenewsNext

अहमदनगर : अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमच्या खात्याचा पासवर्ड विचारून अनोळखी इसमाने शिवाजी निवृत्ती करांडे (रा. सांडवा, ता. नगर) यांच्या खात्यातील ९५ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अनोळखी व्यक्तीने करांडे यांना मोबाईलवरून फोन करून अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या एटीएमचा जुना पासवर्ड रद्द करण्यात आला आहे. नवा पासवर्ड ४५९० असा असून तो तुम्ही नोंद करून घ्यावा, असे सांगितले. जुना पासवर्ड वापरू नका, असा सल्लाही त्यांना मोबाईवरून दिला. जुना क्रमांक काय आहे, याची माहिती त्यांनी करून घेतली आणि मोबाईल बंद केला. त्यानंतर करांडे यांनी बँकेचे खाते तपासले असता त्यामधून ९५ हजार रुपये काढले गेल्याचे लक्षात आले. करांडे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी करांडे यांची फिर्याद दाखल केली असून अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून नगर तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. दरम्यान बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून एटीएम, तसेच बँक खात्यातून रक्कम लुटण्याचे प्रकार नगर शहरात घडले होते. असा प्रकार पुन्हा सुरू झाला असून बँकेच्या नागरिकांनी सावधानपूर्वक व्यवहार करावेत, असे आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Asking for password, looted money from ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.