छावण्या काय मागता, जनावरे पाहुण्यांकडे बांधा; मंत्री राम शिंदे यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:20 AM2018-12-07T05:20:32+5:302018-12-07T05:20:46+5:30

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय समितीच्या पथकासमोरच, ‘जनावरे पाहुण्यांकडे बांधा’, असा अजब सल्ला जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी निवेदन घेऊन येणा-या शेतक-यांना दिला.

Ask for the camps, make them livestock; Controversial statement of Minister Ram Shinde | छावण्या काय मागता, जनावरे पाहुण्यांकडे बांधा; मंत्री राम शिंदे यांचे वादग्रस्त वक्तव्य

छावण्या काय मागता, जनावरे पाहुण्यांकडे बांधा; मंत्री राम शिंदे यांचे वादग्रस्त वक्तव्य

Next

पाथर्डी (जि. अहमदनगर) : दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय समितीच्या पथकासमोरच, ‘जनावरे पाहुण्यांकडे बांधा’, असा अजब सल्ला जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी निवेदन घेऊन येणा-या शेतक-यांना दिला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शिंदे यांच्या या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध सुरू असून सायंकाळी कर्जत येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले.
केंद्राच्या पथकाने पाहणी केल्यानंतर पाथर्डी विश्रामगृहावर बैठक झाली. भाजपा नगरसेवक रमेश गोरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने प्रा. शिंदे यांना निवेदन दिले. चारा छावण्या सुरू करा, अशी शेतकºयांची मागणी होती. या वेळी ‘छावण्या काय मागता, जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा’, असे उत्तर प्रा. शिंदे यांनी शेतकºयांना दिले. या चर्चेचा व्हिडीओ जिल्ह्यात व्हायरल झाला.
>जनावरे ‘वर्षा’वर बांधा - थोरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जनावरे नेऊन बांधा़ तिथे जनावरांच्या चारापाण्याची सोय उत्तम होईल, असा टोला काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी राम शिंदे यांना लगावला़ राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे़ एकाही पाहुण्याकडे पाणी आणि चारा नाही़ त्यामुळे जनावरांच्या चारापाण्यासाठी वर्षा निवासस्थानच चांगली जागा आहे, असे थोरात म्हणाले.

Web Title: Ask for the camps, make them livestock; Controversial statement of Minister Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.