अहमदनगरच्या युवकांचे केदारनाथ येथे मदतकार्य; दरड कोसळून ९ तास झाला होता रस्ता ठप्प

By साहेबराव नरसाळे | Published: July 13, 2023 01:02 PM2023-07-13T13:02:13+5:302023-07-13T13:02:52+5:30

अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंड मधील केदारनाथ ...

Ahmednagar youths did relief work at Kedarnath; The road was blocked for 9 hours after the landslide | अहमदनगरच्या युवकांचे केदारनाथ येथे मदतकार्य; दरड कोसळून ९ तास झाला होता रस्ता ठप्प

अहमदनगरच्या युवकांचे केदारनाथ येथे मदतकार्य; दरड कोसळून ९ तास झाला होता रस्ता ठप्प

googlenewsNext

अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंड मधील केदारनाथ यात्रेला जात असताना पावसामुळे रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली व यामध्ये अनेक भाविक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले व रस्ता पूर्णपणे बंद पडला व रात्री उशिरा शासकीय मदत भेटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील लोकांना मदतीला घेऊन मध्यरात्री स्वतःच्या जीवाची परवा न करता कोसळलेली दरड मोठे दगड बाजूला सरकून नऊ तासानंतर रस्ता मोकळा केला. त्यानंतर रस्ता मोकळा करून तेथील वाहतूक सुरळीत करून दिली. त्यानंतर शासकीय मदत उपलब्ध होऊन स्थानिक पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोठे, गणेश बोठे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले.

Web Title: Ahmednagar youths did relief work at Kedarnath; The road was blocked for 9 hours after the landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.