अहमदनगर महापालिका पोटनिवडणूक : काँग्रेसने गड राखला, भाजपचे डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:03 AM2018-04-07T11:03:39+5:302018-04-07T11:03:39+5:30

अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर सुमारे साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत.

Ahmednagar municipal by-election: Congress retains its hold, BJP deposits confiscated | अहमदनगर महापालिका पोटनिवडणूक : काँग्रेसने गड राखला, भाजपचे डिपॉझिट जप्त

अहमदनगर महापालिका पोटनिवडणूक : काँग्रेसने गड राखला, भाजपचे डिपॉझिट जप्त

Next
ठळक मुद्देकाँग्रेसने गड राखला, भाजपाला डिपॉझिटही वाचवता आले नाहीशिवसेनेच्या विजय पठारे यांनी घेतले १८८६ मते२३४० मते घेऊन काँगे्रसच्या विशाल कोतकरांनी मिळविला विजयभाजपाला मिळाली अवघी १५६ मते

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर सुमारे साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत. या पोटनिवडणुकीत शिवेसना व काँग्रेसमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने गड राखला तर भाजपाला डिपॉझिटही वाचवता आले नाही.
काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवारी (दि. ६) मतदान घेण्यात आले. एकूण ७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. ५ हजार ९४४ मतदारांपैकी ४ हजार ४३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंत ७५ टक्के मतदान झाले होते.
शनिवारी सकाळीच जुन्या महापालिकेच्या कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणी सुरुवातील शिवसेनेचे विजय पठारे यांनी आघाडी घेतली होती. नंतर काँग्रेसचे विशाल कोतकर यांनी पठारे यांचे लीड तोडत निर्णायक आघाडी घेतली. विशाल कोतकर यांची ५०० मतांची आघाडी झाल्यानंतर काँग्रेसच्या गटात उत्साहाचे उधाण आले. ही आघाडी कायम राखत विशाल कोतकर यांनी ४५६ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या विजय पठारे यांनी घेतले १८८६ मते तर भाजपचे महेश सोले यांना अवघी १५६ मते मिळाली. भाजपाची अनामत रक्कम जमा झाली.

Web Title: Ahmednagar municipal by-election: Congress retains its hold, BJP deposits confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.