Ahmednagar Municipal Election : काँग्रेसचा बालेकिल्ल्यात भोपळा : केडगावात भाजप, सेनेचे प्रत्येकी चार उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:46 PM2018-12-10T14:46:24+5:302018-12-10T14:46:37+5:30

महापालिका निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या केडगावमधील प्रभाग १६ मध्ये शिवसनेचे चार, तर प्रभाग १७ मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले.

Ahmednagar municipal election: BJP's Bharatiya Janata Party | Ahmednagar Municipal Election : काँग्रेसचा बालेकिल्ल्यात भोपळा : केडगावात भाजप, सेनेचे प्रत्येकी चार उमेदवार विजयी

Ahmednagar Municipal Election : काँग्रेसचा बालेकिल्ल्यात भोपळा : केडगावात भाजप, सेनेचे प्रत्येकी चार उमेदवार विजयी

googlenewsNext

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या केडगावमधील प्रभाग १६ मध्ये शिवसनेचे चार, तर प्रभाग १७ मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे़ तेथे काँगे्रसमधून भाजपात गेलेल्या मनोज कोतकर यांनी विजय मिळविला आहे़
केडगाव येथे शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्यामुळे येथील निवडणुकीला विशेष महत्व आले होते़ त्यातच काँगे्रसचे सर्व आठ उमेदवार ऐनवेळी भाजपात दाखल झाले़ हे आठही उमेदवार हमखास विजयी होतील, अशी अटकळ बांधली जात होती़ त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ भाजपाने मोठी ताकद केडगावात लावली होती़ शिवसेनेनेही भयमुक्तीचा नारा देत केडगावात प्रतिष्ठा पणाला लावली होती़ केडगावातील प्रभाग सोळामध्ये सर्व चारही शिवेसेनेचे उमेदवार विजयी झाले तर प्रभाग सतरामध्ये सर्व भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत़ त्यामुळे आठ जागा असलेल्या केडगावात शिवसेनेला चार व भाजपला चार जागा मिळाल्या आहेत़ तर काँगे्रसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावात यंदा काँगे्रसला खातेही खोलता आलेले नाही़ विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग १६ (अ) मध्ये शिवसेनेच्या शांताबाई शिंदे, (ब) सुनीता कोतकर, (क) गणेश भोसले, (ड) अमोल येवले वियजी झाले, तर प्रभाग १७ (अ) भाजपचे राहुल कांबळे, (ब) गौरवी नन्नावरे, (क) लता शेळके, (ड) मनोज कोतकर हे विजयी झाले आहेत़

Web Title: Ahmednagar municipal election: BJP's Bharatiya Janata Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.