Lok Sabha Elecation 2019 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ : आजपासून लोकसभेची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:32 AM2019-03-28T11:32:30+5:302019-03-28T11:35:26+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचनेच्या प्रसिद्धीसोबतच आजपासूनच (दि. २८) उमेदवारी अर्जही दाखल करता येणार आहेत

Ahmednagar Lok Sabha Constituency: Lok Sabha election from today | Lok Sabha Elecation 2019 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ : आजपासून लोकसभेची रणधुमाळी

Lok Sabha Elecation 2019 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ : आजपासून लोकसभेची रणधुमाळी

Next

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचनेच्या प्रसिद्धीसोबतच आजपासूनच (दि. २८) उमेदवारी अर्जही दाखल करता येणार आहेत. ४ एप्रिल हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
द्विवेदी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार हेमा बडे, नायब तहसीलदार पी. डी. गोसावी यावेळी उपस्थित होते. नामनिर्देशनपत्र भरताना उमेदवारांसह केवळ ४ जणांनाच दालनात येता येईल.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांना आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरता येईल. अर्ज भरण्याच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणापासून १०० मीटर परिसरात या प्रक्रियेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तीनपेक्षा जास्त वाहने आणि ४ पेक्षा जास्त व्यक्तींना घेऊन या ठिकाणामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. उमेदवारांच्या सुविधेसाठी उमेदवार सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नामनिर्देशन पत्र वाटप, अनामत स्वीकृती, नामनिर्देशन पत्राची छाननी आणि
उमेदवारांना आवश्यक ते माहिती साहित्य वाटप करण्याचे कामकाज या कक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

अर्ज दाखल करण्याचे ठिकाण - जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर
अर्ज दाखल करण्यास प्रारंभ - २८ मार्च ते ४ एप्रिल
वेळ - रोज सकाळी ११ ते दुपारी ३ (सार्वजनिक सुटी वगळता)
अर्जांची छाननी - ५ एप्रिल
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - ८ एप्रिल
मतदान - २३ एप्रिल
मतमोजणी - २३ मे (सरकारी गोदाम, एमआयडीसी, नगर)

साडेअठरा लाख मतदार
या मतदारसंघात एकूण २०३० इतके मतदान केंद्र असणार आहेत. यात ११ सहाय्यकारी मतदानकेंद्रांचा समावेश आहे. अहमदनगर मतदारसंघात एकूण १८ लाख ४६ हजार ३१४ मतदार आहेत. यात ९ लाख ६६ हजार ७९७ पुरुष, तर ८ लाख ७९ हजार ४३१ स्त्री मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या ८६ इतकी आहे. या मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या ६ हजार ७९० इतकी असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

महिला कर्मचाऱ्यांचेच केंद्र
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील २०३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्राची सर्व जबाबदारी ही महिला अधिकारी-कर्मचारी यांना दिली जाणार आहे.

आचारसंहिता भंगाच्या ३५ तक्रारी
सी व्हीजिल अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या ३५ तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात आले आहे. याशिवाय, मतदार यादीतील नाव तसेच अनुषंगिक माहितीसाठी आतापर्यंत १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर २००१ इतके दूरध्वनी आले. त्यांचे समाधान करण्यात आले. आचारसंहिता जारी केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने २ हजार ७६८ लिटर अवैध दारु जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णातील १२५० शस्त्रपरवाना जमा करण्यात आले आहेत, तर १६ हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंधू यांनी दिली.

Web Title: Ahmednagar Lok Sabha Constituency: Lok Sabha election from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.