अबब... पाथर्डी पालिकेचा जेसीबी अडीच वर्षापासून गायब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 06:51 PM2019-01-23T18:51:55+5:302019-01-23T18:52:39+5:30

पालिकेचा दुरुस्तीच्या नावाखाली अडीच वर्षापासून गायब असलेला जेसीबी, गाळ्यांचे बेकायदा हस्तांतरण, दुषित पाणीपुरवठा

Abe ... Pathcari's JCB disappeared from two and a half years? | अबब... पाथर्डी पालिकेचा जेसीबी अडीच वर्षापासून गायब ?

अबब... पाथर्डी पालिकेचा जेसीबी अडीच वर्षापासून गायब ?

googlenewsNext

पाथर्डी : पालिकेचा दुरुस्तीच्या नावाखाली अडीच वर्षापासून गायब असलेला जेसीबी, गाळ्यांचे बेकायदा हस्तांतरण, दुषित पाणीपुरवठा, कर्मचा-यांचे नगरसेवका विरुद्ध नियमबाह्य आंदोलने आदी मुद्या वरून पालिकेची मासिक सभा वादळी ठरली.
पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थित होते. नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी शहरातील उपनगरात सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले असून तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरा बाहेर सांडपाणी वाहून जाण्यसाठी योग्य व्यवस्थापणाची गरज असल्याचे सांगितले. नियमानुसार प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक प्रमाणात सांडपाणी तयार होत नसल्याने सध्या नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रस्ताव सादर करू, असे आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कुणाल पाटील यांनी सांगितले.
नगरसेविका दिपाली बंग यांनी त्यांच्या प्रभागात पाईप लाईन लिकेज असल्याने मैला मिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून नवीन पाइप लाईन टाकण्याची मागणी करत मैला मिश्रीत पाण्याच्या बाटल्या मुख्याधिकारी यांना भेट दिल्या. पालिकेचा जेसीबी गेल्या अडीच वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली गायब आहे. तो कुठे नेऊन ठेवला आहे, असे पालिका मुख्याधिकारी व सभागृहाला विचारले. नगरसेवक बंडू बोरुडे यांनी पालिकेचा जेसीबी गायब असल्याने पालिकेला भाडोत्री जेसीबी घ्यावा लागला. त्यापोटी लाखो रुपये भाडे अनाठाई द्यावे लागल्याचे सांगितले. त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. गर्जे यांनी जेसीबी नगरला दुरुस्तीला पाठवला असून अद्यापि त्याचे दुरुस्ती अंदाज पत्रक तयार नसल्याचे सांगितले. त्यावेळी सर्वच नगरसेवकांनी जेसीबी परत आला पाहिजे असे सांगितले.
प्रवीण राजगुरू यांनी सार्वजनिक शौचालयाचा आज पर्यंत झालेल्या खर्च सभागृहां समोर मांडण्याची मागणी केली. त्यावेळी अभियंता संजय गिरमे यांनी आजपर्यंत शौचालयाच्या कामासाठी १५ लाख रुपये खर्च झाला असून अजून १२ संडासचे कामे सुरु असल्याचे सांगितले. बंडू बोरुडे यांनी पालिकेच्या गाळ्याचे ५० हजार घेवून बेकायदा हस्तांतरण करणारावर जबाबदारी निश्चित करा, असे सांगितले. त्यावर डॉ गर्जे यांनी संबधितावर जबाबदारी निश्चित करा, असे सांगितले. या उत्तराने समाधान न झाल्याने सविता भापकर यांनी या सर्व प्रकाराला नगराध्यक्ष देखील जबाबदार आहेत असे सांगतले. नगरसेवक महेश बोरुडे यांनी पालिका कर विभागाचे कर्मचारी नवनाथ आमले यांना धारेवर धरत चुकीच्या पद्धतीने बाजार वसुली ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याबाबत जाब विचारला. यावेळी नगरसेवक नंदकुमार शेळके, अनिल बोरुडे, नामदेव लबडे, नगरसेविका मंगल कोकाटे, शारदा हंडाळ, संगीता गटांनी, सुनिता बुचकुल, सविता भापकर, सविता डोमकावळे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Abe ... Pathcari's JCB disappeared from two and a half years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.