नाट्य परिषद निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात ७८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 08:33 PM2018-03-04T20:33:02+5:302018-03-04T20:33:02+5:30

78 percent polling in Ahmednagar district for the Natya Parishad elections | नाट्य परिषद निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात ७८ टक्के मतदान

नाट्य परिषद निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात ७८ टक्के मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकृत घोषणा बुधवारीआज मोजणी

अहमदनगर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील दोन केंद्रावर एकूण ७८ टक्के मतदान झाले. मतमोजणी रात्री उशीरा झाली असली तरी याबाबत अधिकृत घोषणा बुधवारी केली जाणार आहे.
या दोन जागासाठी नगरमधून चार उमेदवार रिंगणात आहेत. नगरच्या प्रतिनिधी निवडणुकीत मध्यवर्ती नाट्य परिषदेचे सहकार्यवाह सतीष लोटके व सतीष शिंगटे रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात श्याम शिंदे व उमेश घेवरीकर आहेत. नगर शहरामध्ये ४२५ संगमनेरला १२० होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ४१० मतदारांनी मतदान केले. शेवगावमध्ये १०६ पैकी १०३ मतदारांनी मतदान केले.

Web Title: 78 percent polling in Ahmednagar district for the Natya Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.