विषारी गवत खाल्ल्याने ४६ शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:58 PM2019-06-19T15:58:15+5:302019-06-19T15:58:27+5:30

तालुक्यातील गोधेगाव येथे विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर गेला आहे.

46 sheep and goats die after eating poisonous grass | विषारी गवत खाल्ल्याने ४६ शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू

विषारी गवत खाल्ल्याने ४६ शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू

Next

नेवासा :तालुक्यातील गोधेगाव येथे विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर गेला आहे. नदीचे पाणी कमी झाल्यामुळे परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांना नदीपात्रात उगवलेल्या गवतावर चरण्यासाठी सोडले होते.
हे गवत खाल्ल्यानंतर एक-एक करत अनेक मेंढ्यांनी माना टाकल्या. मेंढ्यांच्या तोंडातून फेस येत होता. अनेक अत्यव्यस्थ झाल्या होत्या. यात काल २० मेंढ्या व ५ शेळ्या दगावल्या होत्या. आजही परिस्थिती अशीच असून अनेक मेंढ्या सकाळी दगावल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आज दुपारी नगरहून पशुवैद्यकीय अधिका-यांचे पथक येणार असल्याची माहिती देण्यात आली.
आज सकाळी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट देत पाहणी केली. काल (दि.१८) मंगळवारी २० मेंढ्या व ५ शेळ्या दगावल्या होत्या. आज (दि.१९) पुन्हा २१ मेंढ्या दगावल्याने मृत मेंढ्यांची संख्या ४१ तर शेळ्यांची संख्या ५ वर गेली आहे.

Web Title: 46 sheep and goats die after eating poisonous grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.