अभाविपच्या वतीने शिर्डीत ४०१ फूटाची तिरंगा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 12:56 PM2018-01-27T12:56:12+5:302018-01-27T12:56:29+5:30

शिर्डी शहर अभाविपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह शहरातील विविध घटक जाती-धर्माच्या भिंती तोडत ४०१ फूटाचा अखंड तिरंगा खांद्यावर घेऊन यात्रेत सहभागी झाले.

401 Futchi Tri-color Tour in Shirdi by ABVP | अभाविपच्या वतीने शिर्डीत ४०१ फूटाची तिरंगा यात्रा

अभाविपच्या वतीने शिर्डीत ४०१ फूटाची तिरंगा यात्रा

googlenewsNext

शिर्डी : शिर्डी शहर अभाविपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह शहरातील विविध घटक जाती-धर्माच्या भिंती तोडत ४०१ फूटाचा अखंड तिरंगा खांद्यावर घेऊन यात्रेत सहभागी झाले.
साईसमाधी शताब्दीच्या पार्श्वभुमीवर समरसतेचा संदेश घेऊन अभाविपने या यात्रेचे आयोजन केले होते. पदयात्रेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके तसेच माजी विश्वस्त सचिन तांबे, रविंद्र गोंदकर, ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या पदाधिका-यांच्या उपस्थीतीत करण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यावरुन ही यात्रा नेण्यात आली. त्यावेळी अनेक ठिकाणी ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यात्रेत साईंनाथ विद्यालय, आदर्श विद्यालय, साईबाबा कन्या विद्यालय, साईबाबा इंग्लिश मीडियम व साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्याथीर्नी सहभागी झाले होते. सांगता समारंभात अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री अभिजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तिरंगा पदयात्रेत शुभम अग्रवाल, सम्राट माळवदकर, चेतन कोते, योगेश जपे, अक्षय गोंदकर, अक्षय महाजन, नेहा दंडवते, मयूर चोळके, अक्षय आल्हाट, महेंद्र उगले, शिवानी चव्हाण, अश्विन पवार, आदित्य ठाकूर, भावीन जोशी, आकाश कोडीतकर, मनीषा तलरेजा, अनाम तांबोळी, सानिया शेख, चैताली रहाणे आदींसह भाजपाचे शिवाजी गोंदकर, किरण बो-हाडे, गजानन शेर्वेकर, तुकाराम गोंदकर,सचिन शिंदे, नगरसेविका वंदना राजेंद्र गोेंदकर आदी पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

 

Web Title: 401 Futchi Tri-color Tour in Shirdi by ABVP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.