पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:13 PM2019-07-01T17:13:02+5:302019-07-01T17:13:40+5:30

 वाट दिवेघाटाची 

My money to go to Pandharasi When to meet Vitai Jani | पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा॥

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा॥

Next

वारकरी पंढरीची ओढ मनामध्ये निर्माण करून श्रद्धापूर्वक अंत:करणाने पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आळंदी, पुणे मुक्कामी विसावल्यानंतर सासवडकडे जाण्यासाठी मोठ्या उत्साहात पुढे मार्गस्थ होतात. कारण, दिवेघाटाची ओढ सर्व वारकरी भाविकांना आकर्षित करते. दिवेघाट हा नैसर्गिकरीत्या खूपच सुंदर असून वाटचाल करताना जर पाऊस आला तर दुधात साखर याप्रमाणे वारकरी भाविकांना होणारा आनंद द्विगुणित होतो आणि यंदा तसेच झाले.

दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होताना पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि वारकरी भाविकांची चालण्याची गती वाढू लागली. पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचा ओलावा आणि वारकºयांच्या मनामध्ये असलेला भावाचा ओलावा यांचा संगम झाल्यामुळे वारकरी भाविकांचा उत्साह चेहºयावरूनओसंडत होता ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाची’ या संत वचनाप्रमाणे वारकरी भाविकांच्या मनातील श्रद्धा क्रियेतून ओसंडत होती. दिवेघाटामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला वेगवेगळ्या बैलजोडी जोडलेल्या असतात.

परंपरेने त्या भागातील शेतकºयांच्या बैलजोडीला मान दिला जातो. त्या परिसरातील शेतकरी पालखीला बैलजोडी लावल्यामुळे खूपच आनंदी होतात. कारण, आपली बैलजोडी पालखीला लावल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजतात. दिवे घाटातून पालखी वर घेऊन जाण्यासाठी पुणे शहरातील अनेक तरुण-तरुणी सहभागी होऊन पालखीला घाटातून पार करण्यासाठी मदत करतात. तरुणांचाही उत्साह पाहण्यासारखा असतो. सध्या विज्ञानाने प्रगती झालेली असतानासुद्धा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पालखीमध्ये सहभागी असतो. कारण माऊलींच्या सेवेचा आनंद तरुणांना आकर्षित करतो. दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होत असताना नैसर्गिकरित्या व आध्यात्मिक दृष्टीने मनाची उंची वाढलेली असते. त्यामुळे दरवर्षी दिवेघाटातून पालखी जाताना आपण पालखीबरोबर असावे, असे अनेक तरुणांना व वारकºयांना वाटत असते. दिवेघाटातून पालखी पुढे मार्गस्थ होते. त्यावेळी वारकरी भाविक थकले असले तरी त्यांच्या मनातील आनंद त्यांना त्यांच्या शारीरिक थकव्याकडे लक्षही जाऊ देत नाहीत.

दिवेघाट पार केल्यानंतर तो आनंद घेऊन ही सर्व वारकरी मंडळी पुढे सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामी थांबतात. सासवड संत सोपानदेवांचे समाधी गाव आहे. या स्थानावरून संत सोपानकाका यांची पालखी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि त्या प्रस्थानाला सर्व वारकरी भाविक, दिंडीप्रमुख उपस्थित असतात हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून भाविकांची गर्दी झालेली असते. सासवडला पोहोचल्यानंतर वारकरी भाविकांना खूप समाधान लाभते. कारण चालत असताना आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड हे दोन मुक्कामाचे टप्पे खूपच लांब असल्यामुळे वारकºयांना मार्गावरील बरेच अंतर कमी झाल्याचे समाधान लाभते. तो भाविक सोयीसुविधांचा विचार न करता नामस्मरण, भजन करत पंढरीची वाट चालत राहतो. त्यामुळे या वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
 - सुधाकर इंगळे महाराज

Web Title: My money to go to Pandharasi When to meet Vitai Jani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.