प्रेरणादायी नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:36 AM2019-05-22T05:36:24+5:302019-05-22T05:36:25+5:30

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम ...

Inspirational Leadership | प्रेरणादायी नेतृत्व

प्रेरणादायी नेतृत्व

Next

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम आपण केवळ शब्दांद्वारे, फसवणूक किंवा चालाखी करून नाही, तर कृतीतून उदाहरण समोर ठेऊन लोकांचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. मूलत: लोकांचे नेतृत्व करण्याची तुमची क्षमता म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या दिशेने, एका विशिष्ट ध्येयाकडे जाण्यासाठी लोकांना प्रेरित करणे.

जर असे घडायला हवे असेल, तर त्यांनी स्वत:हून त्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करता येणे आवश्यक आहे. काम करून घेण्यासाठी तुम्हाला सतत त्यांचा पाठपुरावा करावा लागत असेल, तर नेता बनणे अतिशय अवघड आहे आणि जसा तुमच्या टीमचा आकार वाढत जातो किंवा तुम्ही हाताळत असलेली टीम प्रत्यक्ष संपर्काच्या बाहेर असेल, तर त्यांना प्रेरित करून त्यांचे नेतृत्व करणे अधिक अवघड होईल. आपल्याला लोकांवर सतत लक्ष ठेवून त्यांना हाताळावे लागत असेल, तर तुम्ही त्यांचे नेतृत्व करू शकणार नाही. लोकांचे नेतृत्व तुम्ही तेव्हाच करू शकाल, जेव्हा ते तुम्ही अपेक्षित कार्य करण्यासाठी प्रेरित असतात आणि ते इतके प्रेरित असतात की, तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी ते करून दाखवू शकतील. असे असेल तरच नेतृत्व ही एक श्रमरहित, सहज प्रक्रिया बनते. जर तुम्हाला अपेक्षित अशी कार्य-कृती लोकांनी करण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं असेल, तर तुमचे अवघे अस्तित्वच अशा प्रकारचे उदाहरण बनले पाहिजे की, स्वाभाविकपणे ते स्वत:हून; जे गरजेचे आहे ते करण्यासाठी सिद्ध असतील, अन्यथा नेतृत्व करणे शक्य नाही. कुठल्याही मनुष्यासाठी, शिक्षणाचा अर्थ आपली क्षितिजे रुंदावणे, आपल्या जीवनाची व्याप्ती विस्तारणे असा आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्या मर्यादा विस्तारतो, तेव्हा तो एक आनंददायक अनुभव असतो़, पण मग असे का दिसून येते की, परीक्षेचे दडपण असह्य झाल्याने अनेक मुले आत्महत्या करतात? हे केवळ, शिक्षण आज ज्या प्रकारे दिले जाते, त्यामुळेच घडते आहे.

आजची संपूर्ण शिक्षण प्रणाली मानवासाठी अनेक अर्थाने विनाशकारी बनू शकते. याचा अर्थ असा नाही की, आपण हे शिक्षण देणे बंद करावे. ते फक्त मानवी वात्सल्य आणि मानवी स्पर्शाने दिले गेले पाहिजे, केवळ एक माहितीचा ढिगारा प्रस्तुत करणे नव्हे. मुले जे शिकत आहेत, ते सर्वकाही जीवनाशीच निगडित आहे-एकूण एक सर्वकाही जीवनच आहे, पण आजचे शिक्षण अशा पद्धतीने देण्यात येत आहे की, ते बहुतेक जीवनाशी संबंधित नाही. शिक्षण हे जीवनाशी निगडित हवे. ती सत्यशोधक प्रक्रिया असायला हवी, जिथे विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की, ते काहीतरी नवीन शोधत आहेत. आम्ही ईशा होम स्कूल सुरू केले. त्याला ‘होम स्कूल’ असे म्हटले जाते. कारण ते एका कुटुंबाप्रमाणे चालविले जाते.

वेगवेगळ्या वयोगटांमधील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेतात, एकत्र अभ्यास करतात आणि अत्यंत समर्पित, उच्चविद्याभूषित शिक्षकांसह, जे एकाच वेळेस सहानुभूतीपूर्वक, तसेच मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी झटत असतात, त्यांचासोबत एखाद्या कुटुंबासारखे एकत्रच मोठे होतात, मुलांना अभ्यास करायला लावणे ही काही फार मोठी बाब नाही. दडपण न टाकता, तुम्ही जर त्यांची बुद्धिमत्ता जरा अधिक धारदार केली आणि त्यांच्यात ज्ञानाची ओढ निर्माण केलीत, तर तुम्ही पाहाल, परीक्षेत ते सहजगत्या उत्तीर्ण होतील.


- सद्गुरू जग्गी वासुदेव

Web Title: Inspirational Leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.