शब्दांमुळे आचार-विचारात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 07:21 PM2019-03-23T19:21:04+5:302019-03-23T19:21:43+5:30

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते.

Changes in conduct and thinking due to words | शब्दांमुळे आचार-विचारात बदल

शब्दांमुळे आचार-विचारात बदल

Next

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलया कोय...
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय...

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते. प्रत्येकाचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक व द्वेषरहित असणे गरजेचे आहे. चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी सर्व मनुष्य प्राण्यात आढळतात. तथापी मानवी चक्षू हे फक्त दुसऱ्या व्यक्तीत कोणते अवगुण आहेत. याचाच शोध घेतात. उक्त दोह्यात संत कबीरांनी अंर्तमनाचा वेध घेताना सांगितले आहे की, वाईट बाबीचा शोध घेण्यासाठी गेलो तर मला कु णीही वाईट दिसले नाही. याउलट मी स्वताच्या मनाचा विचार केला तर त्यापेक्षा कू णीही वाईट नाही असे आढळुन आले. बहूतांश नात्यांमध्ये येत असलेला दुरावा हा एकमेकातील दोष व अवगुण याची होत असलेली वाच्यता यामुळे येत आहे. अवगुण दुर्लक्षित करुण सद्गुणांची स्विकृती केल्यासच प्रेम, माया, वृद्धींगत होत असते. रहीमांच्या दोह्यात ही गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित केली आहे. ते म्हणतात,

रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाये..
टुटे से फिर ना जुटे, जुटे गाँठ परि जाये...

दैंनदिन जीवनात समाजात वावरत असताना शब्द आणि कृती विचारपुर्वक ठेवणे गरजेचे आहे. शब्दांची धार ही शस्त्रांच्या धारेपेक्षा तेज असते, म्हणुनच म्हटले आहे, शब्द हे शस्त्र आहे. त्याचा जपुन वापर करा. अपशब्द वापरामुळे महाभारत घडले हे जाणकार सांगतातच. प्रेमपुर्वक शब्द हे भविष्यातील मोठे संकट टाळू शकतात. शब्दांची फुकंर घालुन जखमा बऱ्या होत नाहीत. त्यांचा ठणका कमी होतो. असे व.पू. यांनी देखील म्हटंले आहे. एखाद्याची अगतिकता, दु:ख, आघात जर शब्दाने शिथील होत असतील तर सौहार्दपुर्वक वातावरणात आपण संवाद साधण्यास काय हरकत आहे.

प्रत्येकाकडे शब्दांची शक्ती अमर्याद  असुनही तिच्या वापराबाबत मात्र अनभिज्ञ आहोत. तसे पाहिल्यास जिभेद्वारे होणारे शब्दोच्चार हे धनरुपी असतातच. फक्त त्यात माधुर्य असणे गरजेचे. अन्यथा विपर्यास होण्यास वेळ लागणार नाही. शब्दाचे उगमस्थान हे मुलत: मनात, हदयात आहे. आणि त्यास चांगल्या बुद्धीची जोड असणे गरजेचे आहे. म्हणुन तुकोबा माऊली म्हणतात,

मनाचे संकल्प पावतिल सिद्धी...
जरी राहो बुद्धी त्याचे पायी...

 

चांगल्या विचारांचे उगम हे चांगल्या बुद्धीतच होतात. हे नव्याने सांगणे नको. मानवी मनाशी तर संवाद देहरुपाने चालु असतोच. शब्दामुळे विचार, आचार आणि आचरण बदलते. कळत नकळत शब्द हे संस्कार क रीत असतात. त्यावरुन व्यक्तीमत्व ठरत असते. मानवी नातेसंबध आणि शब्द यांची मोठी सांगड आहे. शब्दाना जसे वजन, किंमत आहे तशी धार देखील आहे. म्हणुन जाणकारांनी म्हटले आहे, शब्दांना आधार हवा, धार नको. शब्दांनी परिवार, नाती आणि समाज जोडला जातो. तसाच तोडला जातो. शब्दाची आणि मनाची कायम गट्टी जमलेली असते. 
विचार शब्द आणि कृती नैतिक व्हायला पाहिजे. तरच ते जीवनात समग्रतेशी एकरुप होऊ शकतात.

- भालचंद्र संगनवार

(लेखक लातूर येथे वरीष्ठ भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत ) 

Web Title: Changes in conduct and thinking due to words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.