Buddha Purnima : गौतम बुद्धांचे 10 अनमोल विचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 12:11 PM2018-04-30T12:11:19+5:302018-04-30T12:11:19+5:30

वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा

Buddha Purnima: buddhism religion Gautama buddha quotes | Buddha Purnima : गौतम बुद्धांचे 10 अनमोल विचार 

Buddha Purnima : गौतम बुद्धांचे 10 अनमोल विचार 

googlenewsNext

मुंबई - वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. 30 एप्रिलला देशभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. यास गुरू पौर्णिमा असेही म्हटले जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, पहिले कारण म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. दुसरे याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि तिसरे म्हणजे यादिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं. गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे 10 अनमोल विचार  

1. जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा. मग विजय नेहमी तुमचाच होईल, मग हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.   

2. कोणत्याही परिस्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य. 

3. जीवनात कोणत्याही उद्देश किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीनं करणं हे महत्त्वपूर्ण आहे. 

4. वाईटानं वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमानं संपवलं जाऊ शकते.

5. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती केवळ दोन चुका करू शकतात, पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग न निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे.

6. भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, फक्त वर्तमान काळावर लक्ष्य केंद्रीत करा. जीवनात खूश राहण्याचा हा एकमेव योग्य मार्ग आहे.  

7. ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे प्रज्वलित करता येतात, तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आनंद वाटल्यानं तो नेहमी वाढतो, कधीही कमी होत नाही. 

8. जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही.

9. नेहमी रागात राहणं, म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेनं पकडून ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो.  

10. रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा, मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते.
 

Web Title: Buddha Purnima: buddhism religion Gautama buddha quotes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.