धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सदस्याचा दिला राजीनामा

By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 30, 2023 01:04 PM2023-03-30T13:04:50+5:302023-03-30T13:05:31+5:30

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सोडून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती मध्ये सामील झाले आहेत.

Dharmanna Sadul resigned from the Congress party | धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सदस्याचा दिला राजीनामा

धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सदस्याचा दिला राजीनामा

googlenewsNext

सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देताना मला दुःख होत आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मी राजीनामा देत आहे. पक्षाने मला भरपूर काही दिले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल मला आदर आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. पत्राद्वारे माझा सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करावा, असे पत्र माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना दिला आहे.

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सोडून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती मध्ये सामील झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सदस्याचा राजीनामा शहर कार्यालयाकडे पाठवला आहे. याबाबत शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना विचारले असता सादूल यांचे राजीनामा पत्र मिळाले असून सदर पत्र प्रदेश कार्यालयाकडे पाठवले आहे. यावर प्रदेश कार्यालय निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Dharmanna Sadul resigned from the Congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.