केंद्राकडून तोडा-फोडा नितीचा अवलंब - राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 05:50 AM2022-08-03T05:50:12+5:302022-08-03T05:50:18+5:30

शेतकरी कामगार पक्षाचा झाला मेळावा

Adoption of Toda-Foda policy by the Center - Rai | केंद्राकडून तोडा-फोडा नितीचा अवलंब - राय

केंद्राकडून तोडा-फोडा नितीचा अवलंब - राय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये ज्या पद्धतीने  ‘तोडा-फोडा’ नितीचा अवलंब केला होता, तसाच प्रकार सध्या केंद्रात  सत्तेत बसलेल्यांकडून सुरू आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगारवर्गाला देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.  सत्ता उलथवण्यासाठी पुन्हा  स्वातंत्र्याचा दुसरा लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी  सर्व  पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत आम आदमी पक्षाचे मंत्री गोपाळ राय यांनी व्यक्त केले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त  वडखळ (ता. पेण) येथे मंगळवारी राज्यस्तरीय मेळावा झाला. त्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे - भाजप सरकारवर कडाडून टीका केली.  
राजू शेट्टी म्हणाले, ‘ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागत असल्याने अस्तित्व टिकविण्यासाठी मनाला मुरड घालून अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. 

सिलिंदर दिले, 
दर आवाक्याबाहेर
महिलांना चुलीवर जेवण करावे लागते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ कोटी ५९ लाख जणांना गॅस वाटप केले. मात्र, त्यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती वाढू लागल्याने एकही नवा सिलिंडर घेतलेला नाही, असे माहिती अधिकारात प्राप्त झाल्याचे राजू शेट्टी यांनी भाषणात सांगितले.

Web Title: Adoption of Toda-Foda policy by the Center - Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.