रामनवमीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन; 'रामनामा'च्या जयघोषाने दुमदुमले शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:23 PM2023-03-30T12:23:05+5:302023-03-30T12:35:21+5:30

श्रीरामनवमीनिमित्त शहरात बाईक रॅली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग

Pooja by the Dy CM Devendra Fadnavis in Nagpur on the occasion of Ram Navami | रामनवमीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन; 'रामनामा'च्या जयघोषाने दुमदुमले शहर

रामनवमीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन; 'रामनामा'च्या जयघोषाने दुमदुमले शहर

googlenewsNext

नागपूर : श्रीराम जन्मोत्सव आज देशभरात साजरा होतोय. नागपुरातही रामनामाचा उत्साह ओसांडून वाहतोय. श्री रामाचा जन्मोत्सव आज, गुरुवारी उपराजधानीत धूमधडाक्यात साजरा केला जातोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  रामनगर येथील राममंदिरात भेट दिली. त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेवून पूजा केली. तसेच मंदिरात उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. श्रीरामनवमीनिमित्त शहरात बाईक रॅली काढण्यात आली यातही उपमुख्यमंत्र्यांनी सहभाग नोंदवला.

उपराजधानीतील भाविकांमध्ये रामनवमीनिमित्त उत्साह संचारला आहे. तर पोद्दारेश्वर राम मंदिर आणि पश्चिम नागपुरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिरं भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली असून अवघे शहर राममय झाल्याचे दृष्य आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज रामचरणी नतमस्तक होत देवाकडे आशिर्वाद मागितले. तसेच मंदिरात उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. याप्रंसगी ढोलताशाच्या गजरासह श्रीरामाच्या जय घोषणेने मंदिर परिसर दुमदुमला होता. आमदार प्रविण दटके व श्रीराम मंदिर समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री दोन गटात झालेल्या राड्यानंतर वातावरण तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी काही जण चुकीची विधानं देत असून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन फडणवीस यांनी केले. छ. संभाजीनगरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करणार असे आश्वासन त्यांनी दिले. 

पश्चिम नागपुरातून आज निघणार शोभायात्रा

पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने रामनवमीनिमित्त ३० मार्चला सायंकाळी ५.३० वाजता रामनगरच्या श्रीराम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा आणि श्रीरामाच्या पादुकांचे पूजन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते होईल. शोभायात्रेत ३१ आकर्षक देखाव्यांचा समावेश राहणार आहे. विविध संस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या वर्षी शाोभायात्रेत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विश्वगुरू भारत यावर आधारित भारतमातेचा चित्ररथ, प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळविल्यानंतर पुष्पक विमानाने अयोध्येत आगमन याशिवाय विविध देवी-देवता आणि विदर्भाच्या आदासा मंदिरातील गणपती, कोराडीतील माँ जगदंबा माता, धापेवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी, शेगावचे गजानन महाराज यांसारखे विविध देखावे विशेष आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.

Web Title: Pooja by the Dy CM Devendra Fadnavis in Nagpur on the occasion of Ram Navami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.