रेती चोरट्याची तलाठ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 08:05 PM2022-08-01T20:05:55+5:302022-08-01T20:06:03+5:30

Crime News : ट्रॅक्टरवर कारवाई करीत असताना चालकाने तलाठी अजय तायडे यांना बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

Talathi beaten up by sand thief; Obstruction in government work | रेती चोरट्याची तलाठ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा

रेती चोरट्याची तलाठ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा

googlenewsNext

मूर्तिजापूर : तालुक्यातील रोहणा येथील नदी पात्रातून दि. ३१ जुलै रोजी रात्री रेतीची चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत असताना चालकाने तलाठी अजय तायडे यांना बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. यावरून आरोपी राज निर्दोष घोसले (२० ) याला माना पोलिसांनी अटक केली.

             रोहणा येथील उमा नदीपात्रात रात्री १० वाजताच्या सुमारास रेती चोरी होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना मिळाल्याने रात्री १० वाजताच्या सुमारास अभयसिंह मोहिते, मंडल अधिकारी महेश नागोलकर, तलाठी अजय तायडे व रमेश वाघमोडे यांचे पथक दुचाकीने घटनास्थळी पोहोचले असता दोन ट्रॅक्टर रेती चोरी करताना आढळून आले. तेव्हा उपस्थित महसूल पथकाने ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यास सांगितले, परंतु ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९ आरके ०७२७ त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. चालकाने ट्रॅक्टर सैरावैरा चालवून पथकाच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला, ट्रॅक्टर मध्ये बसलेले पटवारी तायडे यांनी ट्रॅक्टरचालक राज निर्दोष घोसले (२०, रा. सिरसो गायरान) याला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले तेव्हा आरोपी राजने अजय तायडे यांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर ब्रह्मी गावाजवळ रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात अडकला, तिथेही त्याने तलाठी तायडे यांना ट्रॅक्टरवरून खाली ढकलून दिले, त्यामुळे त्यांच्या छातीत गंभीर दुखापत झाली. त्या पाठोपाठ उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मंडल अधिकारी पाठलाग करीत पोहोचले. चालक राज घोसले याला पकडून ठेवले, दरम्यान, गस्तीवर असलेले माना पोलिस पोहोचले व आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. तलाठी अजय तायडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राज घोसले याच्या विरुद्ध माना पोलिसांनी ३७९, ३५३, ३३२ १८६ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील करीत आहे.

 

आम्हाला मिळालेल्या माहितीवरून मी व सहकारी आम्ही दुचाकीने घटनास्थळी दाखल झालो, तिथे उमा नदी पात्रात दोन ट्रॅक्टर रेती चोरी करताना आढळून आले, एकाने घटना स्थळावरून पळून जाऊन ट्रॅक्टर अंगावर घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तलाठी अजय तायडे यांना मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्याचबरोबर दुसरा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

-अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

Web Title: Talathi beaten up by sand thief; Obstruction in government work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.