जिल्हा परिषदेचे नियमबाह्य वर्ग बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:10 IST2018-06-16T22:10:47+5:302018-06-16T22:10:47+5:30
नवीन वर्ग सुरू करण्याच्या नियमांना बगल देत जिल्हा परिषद शाळांनी तालुक्यातील ज्या गावात पाचवा व आठवा वर्ग सुरू केला, असे नियमबाह्य वर्ग तत्काळ बंद करण्याची मागणी .....

जिल्हा परिषदेचे नियमबाह्य वर्ग बंद करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : नवीन वर्ग सुरू करण्याच्या नियमांना बगल देत जिल्हा परिषद शाळांनी तालुक्यातील ज्या गावात पाचवा व आठवा वर्ग सुरू केला, असे नियमबाह्य वर्ग तत्काळ बंद करण्याची मागणी खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सत्र २०१६-१७ पासून ज्याठिकाणी चौथा वर्ग असेल, त्याठिकाणी पाचवा वर्ग तर ज्याठिकाणी सातवा वर्ग असेल, त्याठिकाणी आठवा वर्ग सुरू केला. त्यामुळे याचा परिणाम खासगी शाळांवर झाला असून अनेक खासगी शाळांचे पाचवा व आठवा वर्ग विद्यार्थी संख्येअभावी बंद पडत आहे.
नवीन वर्ग सुरू करताना किलोमीटरच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत हे वर्ग सुरू केल्याने जिल्हा परिषद शाळांचे वर्ग नियमबाह्य आहे. त्यामुळे हे वर्ग बंद करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून खासगी शाळातील शिक्षकांनी केली आहे.