शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शाळांना जिल्हा परिषद करणार मदत

By अविनाश साबापुरे | Updated: July 25, 2023 20:45 IST

वह्या, पुस्तक, दप्तर खरेदीसाठी देणार पैसे : पण इमारत नुकसानीचे काय?

यवतमाळ : ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यात आतोनात नुकसान झाले. यात अनेक जिल्हा परिषदशाळांमध्ये पुराचे पाणी घुसले. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद पंधराव्या वित्त आयोगातून मदत करणार आहे.

ही मदत देण्यासाठी पूरग्रस्त शाळांमधील माहिती सादर करण्याचे आदेश मंगळवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शाळेतील पटसंख्या, पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, नुकसानीचे स्वरूप आणि भरपाईसाठी लागणारी रक्कम असा अहवाल तातडीने मागविण्यात आला आहे. पुरामुळे अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके, दप्तर आदी वस्तू वाहून गेलेल्या आहेत. अनेक गावांमधील शाळा सुरक्षित असल्या तरी विद्यार्थ्यांची घरे नुकसानग्रस्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना नवीन साहित्य खरेदी करता यावे, यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषदेकडून मदत होणार असली तरी शाळा इमारतींच्या नुकसानीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात पावसामुळे अनेक शाळांच्या भिंती खराब झाल्या, वाॅल कम्पाउंड पडले, नव्याने केलेली रंगरंगोटी खराब झाली. परंतु, या कामांच्या दुरुस्तीचा खर्च कुठून होणार, हा प्रश्न कायम आहे.२१ ठिकाणचा शालेय पोषण आहार भिजलाजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आलेले पोषण आहाराचे धान्य साठवून होते. परंतु, मुसळधार पावसादरम्यान या धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २१ शाळांमधील हा पोषण आहाराचा माल पूर्णत: भिजून खराब झाला आहे. आधीच हे धान्य येण्यासाठी मुख्याध्यापकांना वाट पाहावी लागते, तर आता भिजलेल्या धान्यामुळे विद्यार्थ्यांना आहार नेमका कसा द्यावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळाzpजिल्हा परिषद