शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

जिल्हा परिषद शिक्षकांची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 9:46 PM

इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटचे लोण खेड्यापर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे़ अंगणवाड्या ओस तर, कॉन्व्हेंट फुल्ल अशी स्थिती आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी मिळणे कठीण : भर उन्हात गुरुजी गावागावात, अंगणवाड्या ओस, कॉन्व्हेंट फुल्ल

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटचे लोण खेड्यापर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे़ अंगणवाड्या ओस तर, कॉन्व्हेंट फुल्ल अशी स्थिती आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.पूर्वी तालुका पातळीसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नव्हता़ तेथील अंगणवाड्याही गजबजलेल्या असायच्या़ परंतु आता गावपरिसरामध्ये सेमी इंग्लिश मीडियमच्या शाळा उघडल्या जात आहे़ जिल्हा परिषदे शाळांपेक्षा तेथील शिक्षण दर्जेदार असल्याचे मानुन पदरचे पैसे खर्च करुन विद्यार्थ्यांना खासगी शाळेत दाखल करण्याच्या मानसिकतेत पालकवर्ग दिसून येतो़ शहरी भागातील पालकांच्या स्पर्धेत ग्रामीण पालकांनी उडी घेतली आहे़दुसरीकडे लहान गावातही कॉन्व्हेंटची गर्दी वाढल्याचे चित्र आहे़ कळंब शहरात तर वार्डापोटी कॉन्व्हेंटची दुकाने आहे़ एवढ्यावर न थांबता येथील शेकडो विद्यार्थी राळेगाव व यवतमाळ येथे खासगी इंग्रजी शाळेमध्ये बसने प्रवास करतात़ एकीकडे खासगी इंग्रजी शाळा तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळा सुरु आहे़ खासगी इंग्रजी शाळा देणगी, शिक्षण फी, युनिफॉर्म, गॅदरिंग खर्च आदीच्या माध्यमातून पालकांना आर्थिकदृष्ट्या जेरीस आणतात़ खासगी इंग्रजी शाळेत विद्यार्थी टाकणे ही ग्रामीण भागात ‘फॅशन’ झाली आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे़ या शाळांना तुकडी चालविणे कठीण झाले आहे़ त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत आहे़ काही शाळा बंद होत आहे. शिक्षक संख्या रोडावत चालली आहे़़जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणाची गुणवत्ता आणि संख्यात्मक प्रगती सांभाळणे गरजेचे आहे़ शिक्षणाचे नीट आकलन होणे आणि जीवनमूूल्ये विद्यार्थ्यांत रुजविणे याकरिता मातृभाषेतून शिक्षण मिळावे अशी अनेक पालकांची धारणा असते़ सेमी इंग्लिश पॅटर्नमध्ये या दोन्हींचा सुवर्णमध्ये साधला जाऊ शकतो़ त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा जिवंत ठेवायच्या असेल तर सेमी इंग्लिश पॅटर्न जिल्हा परिषद शाळांनी सर्वत्र सुरु करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे़ तज्ज्ञ शिक्षकांमार्फत सेमी इंग्रजी वर्गांचे अध्ययन करुन जिल्हा परिषद शाळांचा गुणात्मकदृष्ट्या दर्जा वाढविल्या जाऊ शकतो़ तेव्हा कुठे जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांशी स्पर्धा करु शकतील़़

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षक