जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा आर्णी येथे जल्लोष

By Admin | Updated: March 24, 2017 02:11 IST2017-03-24T02:11:20+5:302017-03-24T02:11:20+5:30

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान आर्णीला मिळाल्याचा येथे जल्लोष करण्यात आला. शहराच्या मुख्य मार्गांवरून रॅली काढण्यात आली.

Zilla Parishad elected President of Arni at the invitation | जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा आर्णी येथे जल्लोष

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा आर्णी येथे जल्लोष

रॅली काढून आनंद : माधुरी आडे यांचा सत्कार, आरोग्य, शिक्षण व पाणीप्रश्नाला प्राधान्य
आर्णी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान आर्णीला मिळाल्याचा येथे जल्लोष करण्यात आला. शहराच्या मुख्य मार्गांवरून रॅली काढण्यात आली. धुमाजी नाईक मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. आर्णी तालुक्यात काँग्रेसला मिळालेले यश खऱ्या अर्थाने कामी आले. यात आपल्या मतदारसंघाचा वाटा मोठा असल्याने अध्यक्ष निवडता आला. यासाठी जिल्ह्यातील सहकारी माणिकराव ठाकरे, वसंत पुरके, वामनराव कासावार, विजय खडसे यांचेही सहकार्य मोलाचे ठरले, असे शिवाजीराव मोघे यावेळी म्हणाले. साजिद बेग, अ‍ॅड. प्रदीप यादवराव वानखेडे, सुनील भारती, आरिज बेग, अनिल आडे यांचाही वाटा उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माधुरी आडे यांचा सत्कार करण्यात आला. आपला विकास कामांवर भर राहणार आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना माधुरी आडे यांनी सांगितले.
यावेळी मंचावर राजुदास जाधव, प्रेमदास महाराज, भारत राठोड, साजिद बेग, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, किरण मोघे, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजू वीरखडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पंडित बुटले, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, काँगे्रसचे तालुका अध्यक्ष सुनील भारती, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, आरिज बेग, नगरसेवक अनवर पठाण, विजय मोघे, छोटू देशमुख, विलास राऊत, सुनील येंडे, सविता राठोड, नरेश राठोड, पाणीपुरवठा सभापती कादर इसानी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अतुल देशमुख, युवक काँग्रेसचे नितेश बुटले आदी उपस्थित होते. संचालन आसाराम चव्हाण यांनी केले. मेन रोडवर संतोष श्रीवास, राजेश श्रीवास, रणजित श्रीवास यांनीही माधुरी आडे यांचा सत्कार केला. रॅली आणि सत्कार सोहळ्याला शहरासह परिसराच्या विविध गावातील नागरिकांची उपस्थिती होती. (लोकमत चमू)

Web Title: Zilla Parishad elected President of Arni at the invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.