झरी तहसीलचा कारभार ढेपाळला ; ग्रामस्थ त्रस्त
By Admin | Updated: November 29, 2014 23:28 IST2014-11-29T23:28:54+5:302014-11-29T23:28:54+5:30
झरी तहसीलचा कारभार ढेपाळल्याने तालुकयातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या अतिदुर्गम तालुक्यातील दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयासमोर ताटकळत बसून अधिकाऱ्यांची तास न् तास वाट बघावी लागते.

झरी तहसीलचा कारभार ढेपाळला ; ग्रामस्थ त्रस्त
शिबला : झरी तहसीलचा कारभार ढेपाळल्याने तालुकयातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या अतिदुर्गम तालुक्यातील दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयासमोर ताटकळत बसून अधिकाऱ्यांची तास न् तास वाट बघावी लागते.
झरी तालुका अतिदुर्गम आहे. त्यामुळेच ग्रामस्थांची कामे तातडीने आणि जलदगतीने व्हावी म्हणून झरी येथे तहसीलची निर्मिती करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीमुळे या कार्यालयाचा कारभार ढेपाळला आहे. ग्रामस्थांना तास न् तास नायब तहसीलदाराची वाट बघावी लागत आहे. हा प्रकार आता नेहमीचाच झाला. तहसीलदारच जर कार्यालयात उशिरा पोहोचत असतील, तर इतर अधिकारी, कर्मचारी त्यांचे अनुकरण करणारच आहे.
शुक्रवारी २८ नोव्हेंबरला झरी तहसील कार्यालयाचा फेरफटका मारला असता, या सर्व बाबींचा प्रत्यय आला. शुक्रवारी चक्क दुपारी १२.३० वाजतापर्यंत या कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित झाले नव्हते. कर्मचारी तुरळकच उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता दोनही नायब तहसीलदारांच्या कक्षांना कुलूप लागले होते. तहसीलमधील अनेक टेबल कर्मचाऱ्यांविना होते. मात्र तालुक्यातील ग्रामस्थ रोजमजुरी सोडून त्यांची वाट बघत ताटकळत होते.
तालुक्यातील ज्येष्ठ व निराधार व्यक्ती या कार्यालयात गोळा झाले होते. कुणाला जातीचा तर कुणाला उत्पन्नाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्र्े हवी होती. मात्र संवेदनाहिन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे त्यांना ताटकळत बसावे लागले होते. अनेक निराधार व वृद्ध उपाशीपोटी अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट बघत होते. यााकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)