चमेडियानगरात नाचण्याच्या वादातून तरूणाचा खून

By Admin | Updated: October 4, 2014 23:32 IST2014-10-04T23:32:50+5:302014-10-04T23:32:50+5:30

विसर्जन मिरवणूकीत नाचण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना येथील चमेडीयानगरात गुरूवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

Youth's murder through the promise of dancing in Chamediae | चमेडियानगरात नाचण्याच्या वादातून तरूणाचा खून

चमेडियानगरात नाचण्याच्या वादातून तरूणाचा खून

यवतमाळ : विसर्जन मिरवणूकीत नाचण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना येथील चमेडीयानगरात गुरूवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
धनराज अभिमान पंचारे (२६) रा. डोर्लीपुरा असे मृताचे नाव आहे. डोर्लीपुरा परिसरातील सार्वजनिक उत्सव मंडळाची मिरवणूक निघाली. ही मिरवणूक चमेडीयानगरात पोहोचताच आरोपी शंकर नेवारे (१९) रा. डोर्लीपुरा याने नाचण्याच्या कारणावरून धनराजशी वाद घातला. तरीही धनराज नाचायला तयार नसल्याने शंकरने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संतापाच्या भरात मोठा दगड उचलून त्याने धनराजच्या डोक्यात घातला. त्यानंतर पुन्हा तोच दगड उचलून त्याने धनराजवर जोरदार हल्ला चढविला. त्यामध्ये त्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होवून धनराज जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, शहर ठाणेदार दिलीप चव्हाण हे पथकासह तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविला. त्यानंतर धनराजचा भाऊ राहूल याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात मारेकरी शंकर नेवारे याच्याविरूध्द भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Youth's murder through the promise of dancing in Chamediae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.