यवतमाळातील कळब चौक येथे गोळ्या घालून युवकाची हत्या; तस्करीचा रेतीचा वाद
By सुरेंद्र राऊत | Updated: February 6, 2024 23:43 IST2024-02-06T23:42:33+5:302024-02-06T23:43:52+5:30
चार गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

यवतमाळातील कळब चौक येथे गोळ्या घालून युवकाची हत्या; तस्करीचा रेतीचा वाद
यवतमाळ : शहरातील कळंब चौक येथे चार जणांनी रेती तस्करीतील पैस्याच्या वादातून युवकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री 10: 45 वाजता घडली. या घटनेने शहरात एकच खबळ उडाली आहे.
शादाब खान रफिक खान रा. तायडे नगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर अंबिका नगर पातीपुरा येथील चौघांनी गोळीबार केला. यात एक गोळी थेट छातीत लागल्याने शादाबचा मृत्यू झाला. शादाब नेहमी प्रमाणे कळंब चौक येथील कॅन्टीनवर चहा घेत असताना, मनीष शेंदरे रा अंबिका नगर हा त्याच्या तीन मित्रांसह आला. शादाब सोबत त्यांचा रेतीच्या पैस्यावरून वाद झाला. यात आरोपींनी गोळीबार केला, त्यानंतर लगेच घटना स्थळावरून पळ काढला, नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी शादाब ला मृत घोषित केले, घटनेची माहिती मिळताच कळंब चौक येथे मोठा जमाव जमला, घटनास्थळ परिसरात आरोपीची असलेली दुचाकी जाळण्यात आली.
तणाव वाढत असल्याने खुद्द पोलिस अधिक्षक डॉ पवन बनसोड घटनास्थळी पोहोचले आहे, पोलिस संशयित आरोपीच्या घराची झडती घेत आहे, त्या परिसरात बंदोबस्त लावला आहे. वृत्त लिहीपर्यंत यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.