हिवरा येथे चाकूहल्ल्यात युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:40 IST2021-08-29T04:40:15+5:302021-08-29T04:40:15+5:30

अल्पवयीन आरोपीने केला हल्ला महागाव/हिवरा संगम : तालुक्यातील हिवरा संगम येथे एका अल्पवयीन मुलाने केलेल्या चाकूहल्ल्यात युवक गंभीर जखमी ...

Youth seriously injured in knife attack at Hiwara | हिवरा येथे चाकूहल्ल्यात युवक गंभीर जखमी

हिवरा येथे चाकूहल्ल्यात युवक गंभीर जखमी

अल्पवयीन आरोपीने केला हल्ला

महागाव/हिवरा संगम : तालुक्यातील हिवरा संगम येथे एका अल्पवयीन मुलाने केलेल्या चाकूहल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली.

अनिल परसराम कदम (२६) असे जखमी युवकाचे नाव आहे. आरोपी अल्पवयीन असून हे दोघेही रेतीच्या ट्रॅक्टरवर मजुरी करतात. मोबाइलच्या चॅटिंगवरून त्यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येते. हा वाद विकोपाला जाऊन अनिल कदम किराणा दुकानासमोर बसून असताना आरोपीने पाठीमागून येऊन पाठीत, कमरेत व दंडावर चाकूचे सपासप वार केले. चाकूहल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला तातडीने सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेनंतर विधी संघर्षग्रस्त आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

Web Title: Youth seriously injured in knife attack at Hiwara