खुनाच्या गुन्ह्यात युवकाला कारावास

By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:54+5:302016-04-03T03:51:54+5:30

पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपी युवकाला न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

Youth prison imprisonment for murder | खुनाच्या गुन्ह्यात युवकाला कारावास

खुनाच्या गुन्ह्यात युवकाला कारावास

यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपी युवकाला न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. शिरसाव यांनी शनिवारी हा निकाल दिला.
सुरज श्रीकृष्ण सोनोने (२२) रा. भटमार्ग ता. बाभूळगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा सुकळी येथील जरविंद शहा गुलाब शहा याच्याशी जुना वाद होता. २२ जून २०१३ रोजी सायंकाळी आरोपीने जरविंद याला त्याच्या घरासमोर शिवीगाळ करत डोक्यावर दगड घातला. यात जरविंदचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी कलीम शहा गुलाब शहा याच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला. आरोपी तब्बल दीड वर्ष फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू, सुगत पुंडगे यांनी अटक केली. बाभूळगावचे एपीआय बाळबुध्दे यांनी दोषारोपपत्र सादर केले. प्रत्यक्षदर्शीची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला दहा वर्ष कारावास व एक हजार दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे अ‍ॅड़ संदीप दर्डा यांनी बाजू मांडली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Youth prison imprisonment for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.