रोजगाराच्या शोधात तरुणाने गमावले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:08 IST2017-12-12T22:07:56+5:302017-12-12T22:08:13+5:30

गावात हाताला कोणतेही काम मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात मुंबईकडे निघालेल्या बाभुळगाव येथील एका तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.

Youth lost legs in search of employment | रोजगाराच्या शोधात तरुणाने गमावले पाय

रोजगाराच्या शोधात तरुणाने गमावले पाय

ठळक मुद्देधामणगावात रेल्वेखाली पडला : बाभुळगावचा तरूण जात होता मुंबईला

आॅनलाईन लोकमत
बाभुळगाव : गावात हाताला कोणतेही काम मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात मुंबईकडे निघालेल्या बाभुळगाव येथील एका तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. धामणगाव स्टेशनवर रेल्वेत चढताना खाली पडला आणि दोन्ही पायावरून रेल्वे गेली. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेला हा तरुण सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
जमीरखान अमीरखान (२०) रा. नेहरूनगर बाभुळगाव असे जखमी बेरोजगार तरुणाचे नाव आहे. तो आपला भाऊ समीरखान याच्या सोबत कामाच्या शोधात मुंबईला जात होता. ४ डिसेंबर रोजी तो धामणगाव रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेथे मुंबईचे तिकीट काढले. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढताना त्याचा पाय घसरला आणि तो रुळावर कोसळला. संपूर्ण रेल्वे त्याच्या पायावरून गेली. दोन्ही पायाचे अक्षरश: तुकडे पडले. दरम्यान त्याचा भाऊ याच रेल्वेने पुढे निघाला होता. त्याला ही माहिती चांदूर रेल्वे जवळ मिळाली. त्याने तात्काळ बाभुळगावात फोन करून अपघाताची माहिती दिली.
तोपर्यंत त्याला धामणगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी त्याला सेवाग्रामच्या रुग्णालयात भरती केले. सध्या तो तेथे उपचार घेत आहे.
जमीरचे वडील मोलमजूरी करतात. जमीरवरच संपूर्ण भिस्त होती. मात्र या अपघाताने त्याचे दोन्ही पाय हिरावून घेतले. आर्थिक परिस्थिती अभावी योग्य उपचार ही होत नसल्याची खंत वडील अमीरखान यांनी व्यक्त केली.
या तरूणाला आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन त्याला मदतीचा हात द्यावे अशी अपेक्षा आहे.

Web Title: Youth lost legs in search of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.