काेपा मांडवी येथील युवक अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:35 IST2021-07-25T04:35:11+5:302021-07-25T04:35:11+5:30

दीपक मोहन तुंगलवार असे मृत युवकाचे नाव आहे. तो शुक्रवारी रात्री दुचाकीने गावाकडे जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळली. ...

A youth from Kaepa Mandvi was killed in an accident | काेपा मांडवी येथील युवक अपघातात ठार

काेपा मांडवी येथील युवक अपघातात ठार

दीपक मोहन तुंगलवार असे मृत युवकाचे नाव आहे. तो शुक्रवारी रात्री दुचाकीने गावाकडे जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याच्यावर येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे नेण्यात आले. मात्र आदिलाबाद येथे उपचाराला तो दाद देत नसल्याने त्याला नागपूर येथे नेण्याबाबत सांगण्यात आले. मात्र नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी पांढरकवडा येथे पंचनामा झाल्यानंतर दुपारी त्याच्या पार्थिवावर काेपा मांडवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. तो पाटण येथील एका कृषी केंद्रात काम करत होता.

Web Title: A youth from Kaepa Mandvi was killed in an accident