अघटीत घडले... गणपती विसर्जन करताना युवकाचा बुडून मृत्यू
By विलास गावंडे | Updated: September 30, 2023 16:02 IST2023-09-30T16:00:43+5:302023-09-30T16:02:14+5:30
नदीत उतरणे बेतले जीवावर

अघटीत घडले... गणपती विसर्जन करताना युवकाचा बुडून मृत्यू
हिवरी (यवतमाळ) : गणपती विसर्जन करताना नदीत बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना हिवरी (ता. यवतमाळ) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. गोविंद दशरथ राऊत (२८) असे मृताचे नाव आहे.
गणपती विसर्जनासाठी अनेकजण नदीत उतरले. मात्र, गोविंद याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो बुडाला. वरती येत नसल्याचे पाहून या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी शोध सुरू केला. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर तो आढळला.
तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्याच्या मागे आई, भाऊ, बहीण व मोठा आप्त परिवार आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेवून पुढील तपास सुरू केला.