शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये युवक काँग्रेसने पाळला ‘निषेधासन’ दिन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 15:24 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला. 

यवतमाळ : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला. 

काँग्रेसने येथील आझाद मैदान स्थित महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या परिसरात भाजपा सरकारच्या निषेधाची फलके लावली. सरकारने गेल्या चार वर्षात दिलेली आश्वासने व त्यातून जनतेची झालेली दिशाभूल याचा संगम साधत उपरोधिक आसनांचे फलक लावले. त्या सर्व फलकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वेगवेगळ्या आसनांचे छायाचित्र आहे. त्यावर अभ्यासासन, भक्तासन, वासाळासन, गाजरासन, निषेधासन आदी आसने नमूद आहे. या आसनांमागील अर्थही लिहिला गेला आहे.

सरकारने गेली चार वर्ष कशी अभ्यासात घालविली, भक्तांनी कशी वाचाळ वक्तव्य केली, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर जनतेला कसे गाजर दाखविले आदीबाबींचा उहापोह या आसनांच्या निमित्ताने युवक काँग्रेसकडून फलकांवर करण्यात आला आहे. या फलकांवर पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, युवक काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष अतुल राऊत आदींनी सहभाग घेतला. 

टॅग्स :YavatmalयवतमाळBJPभाजपाcongressकाँग्रेस