यवतमाळ जिल्ह्यात जांब येथे युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:41 IST2020-10-30T15:41:24+5:302020-10-30T15:41:47+5:30
Yawatmal News suicide आर्णी तालुक्यातील जांब येथील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली.

यवतमाळ जिल्ह्यात जांब येथे युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील जांब येथील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली.
आतिष नरसिंग पवार (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. दोन महिन्यापूर्वी गावातील एका अल्पवयीन युवतींच्या पालकांनी त्याच्याविरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली होती. त्यावरून आतिषविरुद्ध भादंवि ३७६ कलमानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री त्याने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.
या प्रकरणी आतिषचा भाऊ चंदन पवार याने आर्णी पोलिसात तक्रार दिली. त्यात त्याने गावातील एका युवतीशी आपल्या भावाचे प्रेमसंबंध होते, असे नमूद केले. या प्रेमसंबधातूनच युवतीच्या पालकांनी खोटी तक्रार दिली. त्यामुळे मानसिक त्रास होऊन आतिषने आत्महत्या केल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला. दरम्यान आर्णी पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.