शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

बाभूळगावातील युवकाच्या खुनात तिघांंना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:30 IST

पानठेल्याच्या जागेतून वाद घालत तिघांनी बाभूळगावातील बसस्थानकासमोर भर बाजारात युवकाचा खून केला. या गुन्ह्यातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देमृताचे वडील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पानठेल्याच्या जागेतून वाद घालत तिघांनी बाभूळगावातील बसस्थानकासमोर भर बाजारात युवकाचा खून केला. या गुन्ह्यातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.जाम्या उर्फ शेख जमीर शेख जब्बार, शाहरूख खाँ बाबा खाँ पठाण, गोलू उर्फ सलीम गफ्फार खाँ पठाण (तिघेही रा.नेहरूनगर, बाभूळगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी ११ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता गणेश दौलत मेश्राम (रा.कोपरा) याचा बाभूळगाव बसस्थानकासमोर धारदार शस्त्रांनी खून केला. गणेश मेश्राम व आरोपींमध्ये पानठेल्याच्या जागेवरून वाद होता. गणेश हा वडील दौलत मेश्राम यांच्यासोबत घटनेच्या दिवशी भाजीपाला खरेदीसाठी बाजारात आला होता. त्यावेळी आरोपी जाम्या याने लोखंडी पाईपने गणेशच्या डोक्यावर वार केले, तर शाहरूखने गणेशच्या पोटवर, छातीवर चाकूने वार केले. हा हल्ला होत असताना आरोपी गोलू याने ‘काट डालो सालों को, मार डालो’ असे जोरजोराने ओरडून हल्लेखोरांना प्रोत्साहन दिले. दौलत मेश्राम यांच्यासमोरच आरोपींनी त्यांचा मुलाचा खून केला. याप्रकरणी बाभूळगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक के.एल. सरोदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. या खटल्यात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश के.आर. पेटकर यांनी नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षदार दौलत गणपत मेश्राम रा.कोपरा, दुसरे प्रत्यक्षदर्शी चंद्रशेखर दिगांबर मेंढे रा.राणीअमरावती, शवविच्छेदन करणारे डॉ. रवींद्र ठाकरे, मंगेश नांदेकर, तपास अधिकारी किशोर सरोदे, एसडीपीओ पीयूष जगताप यांची साक्ष ग्राह्य मानून आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील विजय एस. तेलंग यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी प्रकाश रत्ने यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपीच्या बाजूनी अ‍ॅड. ललित देशमुख, अ‍ॅड. राजेश साबळे, अ‍ॅड. इम्रान देशमुख यांनी युक्तिवाद केला.व्यावसायिक जागेचा वादबाजारपेठेतच दुकान लावण्याच्या जागेचा वाद होता. गणेश मेश्राम याचा पानठेला होता. तर आरोपीचे चिकनचे दुकान होते. यातूनच ही घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झाले.