शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 19:43 IST

चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक

वणी (यवतमाळ) : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन तरुणीवर चाकूहल्ला करीत तिला गंभीररित्या जखमी केले. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडगाव (इजासन) या गावी मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी हल्लेखोर युवकाला अटक केली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून तिची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे सांगितले जाते. गोडगाव (इजासन) येथील ही १७ वर्षीय तरुणी अकराव्या वर्गात शिक्षण घेत आहे. घराशेजारीच राहणाऱ्या निलेश अशोक दोरखंडे (२२) याचे सदर युवतीशी एकतर्फी प्रेम जडले. निलेशच्या वडिलांचा गावात पानटपरीचा व्यवसाय आहे. निलेशने अनेकदा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणी प्रत्येकवेळी त्याला नकार देत होती. यादरम्यान, सदर तरुणी तिच्या मामाच्या मुलाशी मोबाईलवरून चॅटींग करीत असे. ही बाब निलेशला माहित पडली. तिच्याशी बोलण्यासाठी निलेश हा अधुनमधून तिच्या घरी जात होता. मंगळवारी दुपारी तो तिच्या घरी गेला. यावेळी पीडित तरुणीशिवाय घरी कोणीच नव्हते. ही संधी साधून निलेशने तिला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावर तरुणीने त्याला स्वत:च्या हाताने पाणी घेऊन पी, असा सल्ला दिला. त्यानंतर निलेशने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार करत तरुणीने त्याला फटकारले. मामाच्या मुलाशी तु का बोलतेस, या मुद्यावर या दोघात चांगलीच खडाजंगी झाली. वाद वाढत गेला. या वादात संतापलेल्या निलेशने तरुणीवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पीडित तरुणीच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. हल्ल्यानंतर निलेशने घटनास्थळावरून पळ काढला. याचवेळी शेजारी राहत असलेल्या एका लहान मुलाने ही घटना पाहिली. त्याने लगेच धावत जाऊन मुलीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली.वडील धावत घरी पोहोचले, तेव्हा तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. तिला लगेच उपचारासाठी वणी येथील खासगी रूग्णालयात आणण्यात आले. मात्र गंभीर प्रकृती लक्षात घेता, खासगी रूग्णालयाने तिला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जखमी युवतीला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. 

हल्लेखोर युवकाला केले जेरबंदयासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गोडगाव (इजासन) येथे जाऊन आरोपी निलेश अशोक दोरखंडे याला हुडकून काढून अटक केली. त्याच्याविरूद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट