अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:27+5:302021-06-05T04:29:27+5:30
विडूळ : येथून उमरखेडकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. खंडू वामन ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
विडूळ : येथून उमरखेडकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
खंडू वामन गोंडाडे (३३), रा. संगम चिंचोली, असे मृताचे नाव आहे. खंडू गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास चिंचोली येथून एमएच-२९ एएफ-९५२९ या क्रमांकाच्या दुचाकीने साखरा येथे त्याच्या भाच्याच्या लग्नाला जात होता. विडूळनजीक त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. माहिती मिळताच त्याचे नातेवाईक व येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तो निपचित पडून होता. त्याला लगेच उमरखेडच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलीस पाटील गजानन मुलगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन उमरखेड पोलिसांना माहिती दिली. बीट जमादार संतोष चव्हाण, सुदर्शन जाधव पुढील तपास करीत आहेत. मृताचा भाऊ पिंटू वामन गोंडाडे यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.