महागावजवळ कार अपघातात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:41 IST2017-08-24T21:41:22+5:302017-08-24T21:41:38+5:30
करीच्या जेवणासाठी जाणाºया तरुणांची कार झाडावर आदळून एक जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले.

महागावजवळ कार अपघातात तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव कसबा : करीच्या जेवणासाठी जाणाºया तरुणांची कार झाडावर आदळून एक जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आर्णी-दारव्हा मार्गावरील महागाव कसबाजवळ बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.
प्रफुल्ल साहेबराव काळे (२९) रा.शेलू जि.वर्धा असे मृताचे नाव आहे. भरत बाबाराव मडावी (२५), विशाल कुळसंगे (२५), मनीष बनसोड (२७), मुकुंद वरखेडे (२६) सर्व रा. शेलू जि.वर्धा अशी जखमींची नावे आहे. प्रफुल चार मित्रांसह वडगाव आंध येथे करीच्या जेवणासाठी येत होता. महागावनजीक स्विफ्ट डिझायर कारच्या (क्र. एम. एच. ३२/सी-५२८०) चालकाचे नियंत्रण गेले. कार झाडावर आदळली. त्यात पाचही जण जखमी झाले. सर्वांना तत्काळ लोणी येथे प्राथमिक उपचार करून यवतमाळला रवाना केले. त्यापैकी प्रफुल्ल काळे याचा मृत्यू झाला. प्रफुल्ल मूळचा आर्णी तालुक्यातील दहेली इचोराचा रहिवासी असून वर्धा जिल्ह्यातील शेलू येथे शिकवणीवर्ग घेत होता. तो वडगाव आंध येथे मामाकडे जेवायला येत होता.