अपघातात तरुण ठार
By Admin | Updated: August 1, 2015 03:37 IST2015-08-01T03:37:19+5:302015-08-01T03:37:19+5:30
रेतीच्या भरधाव ट्रकच्या मागील चाकात आल्याने तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री..

अपघातात तरुण ठार
बाभूळगाव : रेतीच्या भरधाव ट्रकच्या मागील चाकात आल्याने तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री बाभूळगाव येथे घडली.
वैभव संजय बोरकर (२५) रा. इंदिरा चौक बाभूळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रस्त्याने जात असताना मागून आलेल्या ट्रक एम.एच.३१-सीबी-४५९९ च्या मागील चाकाखाली आला. त्यामुळे त्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्याला तत्काळ नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी चित्रा वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मागे आई, वडील बहीण असा परिवार आहे. (प्रतिनिधी)