यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘एक मिनिट’ स्पर्धा उत्साहात
By Admin | Updated: October 20, 2015 03:07 IST2015-10-20T03:07:21+5:302015-10-20T03:07:21+5:30
स्थानिक यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘केवळ एक मिनिट’ स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्यातील

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘एक मिनिट’ स्पर्धा उत्साहात
यवतमाळ : स्थानिक यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘केवळ एक मिनिट’ स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण सादर केले. पहिली ते पाचवीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
गीत, नृत्य, चित्रकला आदी स्पर्धांचा समावेश या उपक्रमात होता. विक्रांत दलातर्फे आयोजित या स्पर्धेचे परीक्षण समन्वयक यश बोरूंदिया यांनी केले. राधिका काशीद, अदिती पैठणकर, अन्वी कुमेवार, सई पंचभाई, श्रावी बिहाडे, नित भूत, गार्गी भालेराव, पुरब सिंदी, स्मिरा कोल्हटकर, श्रीहरी दातार, सम्यक पिसे, वेद जाधव, ज्ञान्हवी राठोड, सृष्टी ढाले, आकांक्षा जाऊळकर यांनी क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)