शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
4
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
5
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
6
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
7
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
8
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
9
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
10
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
11
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
12
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
13
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
14
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
15
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
16
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

यवतमाळचे तापमान अवघे ६.४ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:00 PM

हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देविदर्भात सर्वात कमी : ऋतुचक्र बदलले, ५० वर्षातला थंडीचा मोठा मुक्काम

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे. हवामान अभ्यासकांनी गत ५० वर्षातील थंडीचा सर्वात मोठा मुक्काम असल्याचे मत नोंदविले. ऋतूचक्र बिघडण्याचा धोका वाढला असून याचा फटका शेतीला बसणार आहे.वातावरण बदलामुळे उत्तरेकडील बर्फ वादळ मध्य भारतापर्यंत पोहचले आहे. यामुळे गत महिनाभरापासून थंडीचा जोर जिल्ह्यात कायम आहे. गत ५० वर्षात प्रथमच असे घडले. हा प्रकार निसर्गचक्र प्रभावित झाल्याचेच संकेत आहे. पूर्वी जानेवारी मध्यापर्यंत थंडीचा जोर कायम राहत होता. आता १० फेब्रुवारीपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिमवादळामुळे उष्ण वारे आणि थंड वारे विदर्भात एकमेकाला भिडणार आहेत. यातून वारंवार कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर प्रामुख्याने जाणवणार आहे. यामुळे गारपिटीसारख्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याचा धोका वाढला आहे.पूर्वी मार्च अखेरीस गारपीट आणि पाऊस येत होता. आता हिमवादळामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अशा घटना घडत आहे. जंगल क्षेत्र घटल्याचा हा परिणाम आहे. यातून विविध क्षेत्रामध्ये विपरित परिणाम होण्याची चिन्हे आहेत.शेतीचा लागवड कालावधी लांबणारतापमानातील सततच्या बदलाने भुईमुगाचे क्षेत्र बाद होण्याची चिन्हे आहेत. तर गहू आणि हरभरा लागवडीचा कालावधी लांबला आहे. यावर्षी तर शेतकऱ्यांनी पºहाटी उपटून गव्हाचीच मोठ्या प्रमाणात लागवड केली. निसर्ग प्रकोपावर मात करणारे पीक शेतकऱ्यांना निवडावे लागणार आहे.यावर्षीचे सर्वात कमी तापमानयवतमाळ जिल्ह्यात सोमवारी तापमानाचा पारा १०.४ अंशावर होता. मंगळवारी हे तापमान निम्म्यावर आले. ६.४ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. यावर्षीचे सर्वात कमी तापमान मंगळवारी नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वात कमी तापमान यवतमाळात नोंदविण्यात आले आहे.निसर्गाच्या असमतोलाने तापमानात बदल होत आहे. यामुळे थंडीचा मुक्काम वाढला. उन्हाचा पाराही यावर्षी वर चढण्याची चिन्हे आहेत. तापमान बदलाचा हा ग्लोबल इफेक्ट स्थानिक पातळीवर झाला आहे. यामुळे गारपीट होण्याचा धोका कायम आहे.- सुरेश चोपने,हवामान अभ्यासक, चंद्रपूर

टॅग्स :Temperatureतापमानweatherहवामान