यवतमाळची बॅडमिंटन चमू राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 02:16 IST2015-08-30T02:16:24+5:302015-08-30T02:16:24+5:30
मलकापूर येथे ६१ वी राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे.

यवतमाळची बॅडमिंटन चमू राज्यस्तरावर
यवतमाळ : मलकापूर येथे ६१ वी राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. त्यात यवतमाळ जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनतर्फे नवनिर्माण क्लबच्या मुलांचा संघ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहे.
ही स्पर्धा २८ आॅगस्टला सुरू झाली असून ३१ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. संघाचे कर्णधार आकाश पिंपळकर आहे. तसेच वैभव हिवरकर, आदित्य ठाकरे, सुरज पोराटाके, सुधांशू सरागे, श्रीनिवास गायकवाड, प्रतीक क्षीरसागर, रोशन कथले, निखिल तायडे, आकाश आकरे यांचा समावेश आहे.
प्रशिक्षक शुभम लांबट असून गौरव नेरकर या संघाचे व्यवस्थापक आहेत. या खेळाडूंना राहुल काळे, डॉ. उल्हास नंदूरकर, सौरभ देऊळकर, राजेश दहीवडे, अमित तिखिले, विवेक गाजर्लावार यांचे मार्गदर्शन लाभले. जयंत चोपडे, महल्ले, प्राचार्य कोरे, अभिजित दाभाडकर, आशीष फाले यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)