शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा परिषदेचे 'ते' २१ कर्मचारी निलंबित; सीईओंच्या कारवाईने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:47 IST

Yavatmal : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे, तसेच अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अभिप्रेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :जिल्हा परिषद प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात शिक्षक, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी मोहीम राबविली होती. या मोहिमेत ऑफलाइन प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून ठराविक मुदतीत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र विहित कालावधीत अनेक कर्मचारी दिव्यांगांचे ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) सादर करण्यात अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर अशा २१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयाने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे, तसेच अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अभिप्रेत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, समाज कल्याण विभाग, वित्त विभाग व अन्य विभागांतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी सीईओ मंदार पत्की यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवस पडताळणीची मोहीम घेतली. पडताळणी झालेल्या ४४७ दिव्यांग प्रमाणपत्रांपैकी ३८२ ऑनलाइन आणि ६५ ऑफलाइन असल्याचे आढळून आले. सीईओ पत्की यांनी ६५ कर्मचाऱ्यांना 'शोकॉज' बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, सरळसेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता आदी बाबींचा लाभ घेतात. मात्र, कर्मचारी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र सादर करू शकले नाही. त्याची गांभीर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की यांनी थेट निलंबनाची कारवाई केली. यात पंचायत विभागाचे सहा, शिक्षण विभागाचे ११ सहायक शिक्षक व सामान्य प्रशासन विभागाचे चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

वैश्विक ओळखपत्र अनिवार्य

दिव्यांगासाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र २७ जून २०२४ च्या परिपत्रकान्वये अनिवार्य केले आहे. एक वर्षाच्या मुदतीत ओळखपत्र (यूडीआयडी) प्राप्त करून घेणे आवश्यक होते. त्याची मुदत २६ जून २०१५ रोजी संपुष्टात आली.

'त्या' शिक्षकांचा निर्णय नाही

पडताळणीत सर्वाधिक ४७ शिक्षकांकडे ऑफलाइन १ प्रमाणपत्र आढळून आले. त्यांना नोटीस पाठवून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शिक्षकांनी न्यायालयात धाव घेत आव्हान दिले. तेथे त्यांना दिलासा मिळाला. न्यायालयाकडून दिलासा मिळालेल्या शिक्षकासंदर्भात 3 सीईओंनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

"जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता आदी बाबींचा लाभ घेतात. पडताळणीत दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) सादर करू शकले नाही. त्यामुळे २१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. न्यायालयात गेलेल्या शिक्षकांसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही."- मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal Zilla Parishad Suspends 21 Employees Amid Disability Certificate Scrutiny

Web Summary : Yavatmal Zilla Parishad suspended 21 employees for failing to provide valid disability identification. CEO Mandar Patki initiated the action after a certificate verification drive revealed discrepancies. The move follows a deadline for submitting the Unique Disability Identification (UDID) card, causing a stir within the council.
टॅग्स :Yavatmalयवतमाळzpजिल्हा परिषदGovernmentसरकार