शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा परिषद: अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरणार 20 डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 16:00 IST

सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हा आदेश देण्यात आला आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना 120 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता 20 डिसेंबर रोजी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्या सभापतींची निवड करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आला आहे. 23 ऑगस्टला मुदत संपल्यानंतर 120 दिवसांचा कालावधी वाढीव देण्यात आला होता. आता तो अवधी 20 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया घेण्यात यावी असा आदेश उपसचिव र.आ. नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.

सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हा आदेश देण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात  राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत राज्यातील महाआघाडी फॉर्म्युला राबविला जाणार आहे. त्यासाठी नेत्यांकडून चाचपणी सुरु आहे.

सर्वाधिक संख्याबळ असलेली शिवसेना अध्यक्ष पदासाठी दावेदारी करेल तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विषय समित्यांमध्ये महत्वाची पदे मिळविण्यासाठी, उपाध्यक्ष पदासाठी आपल्या स्तरावर दबाव निर्माण करतील अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात राबवण्यात आलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यवतमाळच्या जिल्हा परिषेदत यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार.

वचपा काढण्याची संधी

शिवसेनेकडे सर्वाधिक 20 सदस्य आहेत. अडीच वर्षापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचे निश्चित झाले होते. मात्र घोडेबाजारानंतर भाजपने सत्तेत उपाध्यक्षपद, हस्तगत केले. त्यावेळी शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले. हा वचपा काढण्याची संधी शिवसेना नेत्यांकडे आली आहे. यात केवळ महाविकास आघाडी हे समीकरण जुळविणे बाकी आहे.