यवतमाळ शहराचा होणार कायापालट

By Admin | Updated: February 4, 2016 02:33 IST2016-02-04T02:33:03+5:302016-02-04T02:33:03+5:30

नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा येत्या काही वर्षात कायापालट होणार असून त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा बनविण्यात आला

Yavatmal will be transformed into a city | यवतमाळ शहराचा होणार कायापालट

यवतमाळ शहराचा होणार कायापालट

प्रवीण प्रजापती : अमृत शहर योजनेची अंमलबजावणी
यवतमाळ : नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा येत्या काही वर्षात कायापालट होणार असून त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा बनविण्यात आला असल्याची माहिती बुधवारी पत्रपरिषदेत नगर परिषद सदस्य प्रा. प्रवीण प्रजापती यांनी दिली.
शहरातील हिंदू स्मशान भूमीचे पूर्णपणे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सोबतच विविध खुल्या मैदानाचे सौंदर्यीकरण आणि त्या ठिकाणी विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. आठ ग्रामपंचायतचे यवतमाळ नगर परिषदेत विलिनीकरण करण्यात आले. या सर्व परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी १६ कोटी ५० लाख रुपये दिले आहे. यवतमाळ नगर परिषदेने राज्यात सर्वाधिक ९११ हे सर्वाधिक घरकुल बांधल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. अमृत शहर योजना राबविण्यात येत आहे. यासोबतच भुयारी गटार योजना, शहरातील सर्व विजेचे केबल अंडरग्राऊंड, नागरिकांना चोविस तास पाणीपुरवठा, सौंदर्यीकरण आदी महत्वपूर्ण योजना राबविण्यात येणार असून त्याचा आराखडा तयार असल्याचे प्रवीण प्रजापती यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला नगर परिषदेचे उपाध्यक्ष मनीष दुबे, तसेच नियोजन सभापती शैलेश दालवाला, नगरसेवक रेखा कोठेकर, प्रणिता खडसे, मीना मसराम आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal will be transformed into a city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.