शौचालय बांधकामात यवतमाळ विदर्भात अव्वल

By Admin | Updated: April 4, 2016 05:30 IST2016-04-04T05:30:20+5:302016-04-04T05:30:20+5:30

वैयक्तिक शौचालय बांधकामात यवतमाळ जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला असून राज्यात पाचव्या स्थानावर

Yavatmal tops Vidarbha in toilets | शौचालय बांधकामात यवतमाळ विदर्भात अव्वल

शौचालय बांधकामात यवतमाळ विदर्भात अव्वल

यवतमाळ : वैयक्तिक शौचालय बांधकामात यवतमाळ जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला असून राज्यात पाचव्या स्थानावर आहे. या वर्षात ३५ हजार १६७ शौचालयाचे बांधकाम करून हागणदारीमुक्त अभियानात जिल्ह्याने मोलाची भर घातली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून त्यांना १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. आॅनलाईनवरील बेस लाईनच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार २८९ कुटुंब आहे. त्यापैकी २ लाख २७ हजार २४३ कुटुंबाकडे शौचालय नाही तर २ लाख २५ हजार ४६ कुटुंबाकडे शौचालय असून त्याचा ते वापर करीत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्याने ३५ हजार १८१ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. त्यात सर्वाधिक बांधकाम बाभूळगाव तालुक्यात ३ हजार १४५ शौचालयांचा समावेश आहे.
आर्णी १८७८, दारव्हा २३०२, दिग्रस १९६०, घाटंजी २१४०, कळंब १७५०, केळापूर २१३२, महागाव २८३४, मारेगाव ११२६, नेर १३७०, पुसद २९२०, राळेगाव २३६०, उमरखेड २४७५, वणी १७९०, यवतमाळ २४४८ आणि झरी जामणी तालुक्यात २१९० शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनात विदर्भात यवतमाळ जिल्हा अव्वल ठरला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

बाभूळगाव पंचायत समिती हागणदारीमुक्तीच्या वाटेवर
४हागणदारीमुक्त योजनेमध्ये बाभूळगाव तालुक्याचे काम अव्वल असून संपूर्ण बाभूळगाव पंचायत समिती हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या तालुक्यात ३ हजार ५४५ शौचालय बांधण्यात आले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे बाभूळगाव पंचायत समितीला हे यश मिळाले.

Web Title: Yavatmal tops Vidarbha in toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.