शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

यवतमाळात चार हजारांवर अनधिकृत झोपड्या, दिवसागणिक वाढतोय पसारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

यवतमाळ शहरातील आंबेडकरनगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; मतदार वाढत असल्याने मिळतेय राजकीय अभय, आरोग्याला धोका

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात राजकीय हेतू साधण्यासाठी वाढणाऱ्या अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रभाग व वाॅर्डातील मतदारांची गोळाबेरीज करून अशा झाेपड्यावाढीला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन दिले जाते. अनेक झोपडपट्टीवासियांचा मसीहा बनून राजकीय उद्देशाने काही लोक तेथे गुंतवणूक करताना दिसतात. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा प्रयोग एकाने केला होता. माहोल तयार करण्यापुरते समर्थक यातून त्यांना मिळाले होते. आजही शहरात १९ अनधिकृत झोपडपट्टीचा परिसर आहे. त्याठिकाणी जवळपास चार हजारांवर झोपड्या थाटण्यात आल्या आहेत. यवतमाळ शहरातील आंबेडकरनगर या वस्तीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दारव्हा रोडवरील अंबानगर, धामणगाव रोडवरील गौतमनगर, तलावफैल या ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण आहे. याशिवाय उमरसरा परिसरात पाच, पिंपळगावमधील एक, लोहारा येथे चार, वडगाव परिसरात वाघाडी, जनकनगरी येथे अतिक्रमित वस्ती आहे. भोसा येथेही चार ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमित वस्त्या तयार झाल्या आहेत. यातील काही वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. अंबानगर, इंदिरानगर या वस्त्यांमध्ये भीषण स्थिती आहे. अतिक्रमित वस्त्यांमध्ये अवैध दारूविक्री व गुन्हेगारीला पोषक वातावरण पहायला मिळते.

वीज, पाणी मिळते कसे ?बऱ्याच झोपड्यांमध्ये वीज व पाण्याची सुविधा नाही. आजूबाजूच्यांकडून वीजपुरवठा घेऊन दिवाबत्तीची सोय केली जाते. घरात शाैचालय नसल्याने फारसे पाणी लागत नाही. सार्वजनिक हातपंप अथवा नळावरून पाणी भरले जाते. दारव्हा रोडवरील नेताजीनगर झोपडपट्टीत अनधिकृत झोपड्या उभारल्या जात आहेत. त्यांनी सार्वजनिक शाैचालयावरच्या हातपंपालाच पानवठ्याचे ठिकाण बनविले आहे. परिसरातून जाणाऱ्या विद्युत तारेवर आकडा टाकून वीज घेतल्याचेही दिसून येते.

झोपडपट्टीमध्ये अवैध धंद्यांना खतपाणी मिळते. अनेक सक्रिय गुन्हेगार तसेच पोलीसदप्तरी फरार असलेले गुन्हेगार झोपडपट्ट्यांमध्ये आश्रयाला राहतात. अवैध दारू गाळप करणे, गांजाची तस्करी असे व्यवसाय खुलेआम चालतात. आरटीओ कार्यालयामागील भागात हा प्रकार सुरू आहे.

तलावफैल परिसरातील नाल्यावरच्या काठावर गावठी दारू काढली जाते. परिसरातील जंगलातून मोठ्या प्रमाणात लाकडाची कटाई करून आणले जाते. काहींनी हा आपला व्यवसाय बनविला आहे. याच ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार होत असतात. नियंत्रणासाठी उपाययोजनेची गरज आहे.

सर्व्हे करून पुनर्वसनाचा प्रयत्न केला जाईलअनेक वर्षांपासून असलेल्या अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न केला जाईल. मात्र, अलीकडच्या काळातील झाेपड्या काढण्यात येईल. याबाबत सर्वेक्षण करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. संवेदनशील राहूनच ही समस्या हाताळली जाईल. - वर्षा राठोड, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपरिषद, यवतमाळ 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण