शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ : धरणावरून शिवसेना-भाजपचे आजी-माजी आमदार धावले एकमेकांच्या अंगावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 10:34 IST

आंदोलनस्थळी झालेल्या बाचाबाचीनंतर चक्क एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची घडली घटना.

मारेगाव (जि. यवतमाळ) : धरणाच्या प्रश्नावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाजपचे वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यात  तालुक्यातील हटवांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी बाचाबाचीनंतर चक्क एकमेकांच्या अंगावर धावून गेले. ‘हे तुमच्या सरकारचे पाप आहे’ असा आरोप दोघांनीही एकमेकांवर केला. त्यामुळे वादाची ठिणगी पेटली. विश्वास नांदेकर थेट आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अंगावर धावून गेले. मात्र, उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करीत असतानाच तेथे आमदार बोदकुरवारही पोहोचले होते. दोघेही शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

धरणाची मंजुरी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात आणि शेतकऱ्यांचे सातबारावरून नाव कमी करण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या काळात घडला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५मध्ये मोबदल्यात वाढ केली होती. यावरून वाद झाला.     संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदारमी आमदार बोदकुरवार यांना सन्मानपूर्वक बसायला जागा दिली. मात्र, त्यांनी या सर्व प्रकरणाला ठाकरे सरकार दोषी आहे, असा आरोप केला. यावरून वाद झाला. ठाकरे सरकारवर अकारण टीका सहन करणार नाही.विश्वास नांदेकर, माजी आमदार

टॅग्स :YavatmalयवतमाळShiv SenaशिवसेनाBJPभाजपा