महापरीक्षा पोर्टल बंदसाठी यवतमाळात भर पावसात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:05 IST2019-07-29T14:01:48+5:302019-07-29T14:05:05+5:30
शासकीय नोकरभरतीसाठी वापरण्यात येत असलेले महापरीक्षा पोर्टल कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात भरपावसात मोर्चा काढण्यात आला.

महापरीक्षा पोर्टल बंदसाठी यवतमाळात भर पावसात मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय नोकरभरतीसाठी वापरण्यात येत असलेले महापरीक्षा पोर्टल कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात भरपावसात मोर्चा काढण्यात आला.
अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळातील तिरंगा चौकात हा मोर्चा काढला. यावेळी महापोर्टलचा भाषणातून पंचनामा करण्यात आला. पोर्टलविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाल्या. महापोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता नाही, आॅनलाईन परीक्षांचे निकाल सहा-सहा महिने लागत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी युवकांनी केल्या आहेत. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रहारचे नगरसेवक नितीन मिझार्पुरे, बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.